भरूच (गुजरात) येथील प्रसिद्ध श्री पशुपति महादेव मंदिराला अज्ञाताकडून आग लावण्याचा प्रयत्न !

‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करणे) लिहिलेली पत्रके सापडली !

भरूच (गुजरात) – येथील प्रसिद्ध श्री पशुपति महादेव मंदिराला आग लावण्याचा प्रयत्न २२ मार्चला पहाटे करण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी पाहिले असता एक व्यक्ती मंदिरात ज्वलनशील पदार्थ टाकत असल्याचे दिसत आहे. नंतर तो तेथून पसार झाला. थोड्या वेळातच येथे आग लागली. फरार झाला. स्थानिक हिंदूंनी ते पाहिल्यावर आग विझवली. या प्रकरणी पोलिसांना कळवण्यात आले. येथे पोलिसांना काही पत्रके सापडली आहेत. त्यावर ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करणे) लिहिले आढळले. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहे. काही काळापूर्वी या मंदिरातून ५ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. या मंदिराचे व्यवस्थापन शंकराचार्यांच्या द्वारकापीठाकडून केले जाते.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देशात मुसलमान आणि त्यांची धार्मिक स्थळे नव्हे, तर हिंदूंची मंदिरे असुरक्षित !