सातारा, २२ मार्च (वार्ता.) – येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच रेणावळे आणि कुसगाव या गावात घेण्यात आलेल्या व्याख्यानांना समाजातून उदंड प्रतिसाद लाभला.
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांनी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी सौ. डाफळे यांनी ‘हिंदु धर्माचे महत्त्व आणि हिंदु धर्मातील स्त्रीचे स्थान’ याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. ६० हून अधिक महिलांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला, तसेच वाई तालुक्यातील रेणावळे या गावात महाशिवरात्र यात्रेचे औचित्य साधून ‘महिला सबलीकरण आणि आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी व्याख्यान घेण्यात आले. सौ. डाफळे यांनी जीवनातील अध्यात्माचे महत्त्व, नामजपाचे महत्त्व याविषयी उपस्थितांना अवगत केले. १०० हून अधिक जिज्ञासू आणि माता-भगिनींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. सातारा तालुक्यातील कुसगाव येथे हनुमान सेवा मंडळाच्या वतीने श्रीसत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सौ. भक्ती डाफळे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. या वेळी सौ. डाफळे यांनी ‘जाज्वल्य हिंदुत्व आणि लव्ह जिहाद’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी कुसगाव आणि पंचक्रोशीतील ७० हून अधिक जिज्ञासूंनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.