निर्वासितांना नागरिकत्व देतांना त्यांची सुंता झाली आहे का, हे पडताळावे !

मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांचे माजी राज्यपाल अन् भाजपचे नेते तथागत रॉय यांची मागणी !

मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांचे माजी राज्यपाल अन् भाजपचे नेते तथागत रॉय

कोलकाता (बंगाल) – मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांचे माजी राज्यपाल अन् भाजपचे नेते तथागत रॉय यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी (सीएएविषयी) विधान केले आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, हिंदु, बौद्ध किंवा ख्रिस्ती निर्वासितांना नागरिकत्व देतांना पुरुषा निर्वासिताच्या धर्माची पडताळणी ‘त्याची सुंता झाली आहे का ?’, हे पाहून करावी, अशी मागणी केली आहे.

रॉय म्हणाले की, तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये सीएएबद्दल सतत चुकीची माहिती पसरवत आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशातील इस्लामी अत्याचारांमुळे केवळ नेसत्या वस्त्राने भारतात आलेल्या हिंदु निर्वासितांना नागरिकत्व कसे मिळणार ? आणि ज्यांचे नागरिकत्व अर्ज फेटाळले गेले, त्यांची स्थिती काय असेल ?, हे केंद्रीय गृहमंत्रालयाने लवकरच स्पष्ट करावे. तसेच जर हिंदु, बौद्ध आणि ख्रिस्ती यांचे नागरिकत्व अर्ज काही कारणास्तव फेटाळले गेले असतील, तर त्यांना येथे रहाण्याची अनुमती द्यावी. त्यांना कोणत्याही प्रकारे निर्वासितांच्या शिबिरामध्ये पाठवले जाणार नाही, हे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • तथागत रॉय यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. सीएए कायद्याचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी धर्मांध घुसखोर अपलाभ घेऊन भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सतर्कता बाळगण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवणे आवश्यक !