चित्रपटांसाठी ‘सेन्सॉर बोर्ड’ (केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ) आहे; मात्र वेब सिरीज आणि ओटीटी (‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ ! चित्रपट आदी पहाण्याचे ऑनलाईन माध्यम) यांच्यासाठी हे लागू झालेले दिसत नाही. आज वेब सिरीजमधून हिंसेला प्रोत्साहन दिले जात आहे. वेब सिरीजमधील संवादामध्ये शिवराळ भाषा, दाखवण्यात येणारी हिंसा यांमुळे ते पाहून देश-विदेशातील लहान मुलेही त्याचे अनुकरण करत आहेत. हे थांबायला हवे.