Netflix Denigration Of ShriRam :मुसलमान नायकाकडून भगवान श्रीराम मांसाहार करत असल्याचा उल्लेख !

  • ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘अन्नपूर्णानी’ चित्रपटात श्रीरामाचा अवमान !

  • चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन !

  • ब्राह्मण हिंदु तरुणी नमाजपठण करत बिर्याणी बनवत असल्याचा प्रसंग !

  • चित्रपटाच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

मुंबई – ‘अन्नपूर्णानी’ या ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप, म्हणजे ‘अ‍ॅप’च्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आदी कार्यक्रम पहाणे) मंचावरून प्रसारित होणार्‍या चित्रपटामध्ये हिंदु ब्राह्मण मुलीला बिर्याणी बनवण्यासाठी नमाजपठण करावे लागत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील नायक या मुलीला ‘श्रीराम वनवासात मांसाहार करत होते’, असे सांगत असल्याचे दिसत आहे. यावरून ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘झी स्टुडिओज’ यांच्या विरोधात ‘हिंदु आयटी सेल’ या संस्थेचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

१. रमेश सोलंकी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, जगभरात श्रीराममंदिरात श्री रामललाची प्रतिष्ठापना होण्याचा आनंद साजार केला जात असतांना ‘अन्नपूर्णानी’ हा हिंदुविरोधी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘झी स्टुडिओज’ आणि ‘ट्रायटेंट आर्टस’ हे त्याचे निर्माते आहेत. यात अभिनेते (फरहान) अभिनेत्रीला मांस खाण्यासाठी प्रेरित करतांना ‘भगवान श्रीराम वनवासाच्या काळात मांस खात होते’, असे सांगत आहे, तसेच हा चित्रपट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत आहे. हा चित्रपट श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या काळात यासाठीच प्रदर्शित केला गेला आहे, जेणेकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाव्यात.

Annapoorani Movie Review | Review of Annapoorani | Annapoorani Movie Review in Hindi | Annapoorani 

(सौजन्य : Filmy Bukhar)

२. सोलंकी यांनी तक्रारीमध्ये अभिनेते नीलेश कृष्णा, जय, जतिन सेठी, आर्. रवींद्रन्, पुनित गोएंका, शरीक पटेल आणि अभिनेत्री मोनिका शेरगलअन् नयनतारा यांचीही नावे नमूद केली आहेत.

३. या चित्रपटात एका हिंदु पुजार्‍याच्या मुलीचा प्रियकर मुसलमान तरुण असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात ब्राह्मण तरुणी ‘शेफ इंडिया’ या कार्यक्रमात सहभागी असल्याचे दाखवण्यात आले आहे. येथे ती नमाजपठण करून बिर्याणी बनवत आहे. याविषयी ती म्हणते की, नमाजपठण करून बिर्याणी बनवल्याने त्याला चांगली चव येते.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका 

  • केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला प्रमाणपत्र देतांना हे दिसत नाही का ? कि ‘लाच घेऊन प्रमाणपत्रे दिली जातात’, असे त्यांच्यावर होणारे आरोप खरे आहेत, असे समजायचे ?
  • केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणार्‍या या मंडळाकडे आता सरकारने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !