रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. डॉ. निशांत दास (सचिव, तरुण हिंदू), धनबाद, झारखंड.

अ. ‘या स्थानाची स्वतःची आभा आहे. येथील भक्ती आणि अध्यात्म (साधना) यांमुळे आश्रमात  सर्वत्र  सकारात्मक स्पंदने आहेत.’

२. श्री. कुरु ताई (उपाध्यक्ष, अरुणाचल प्रदेश बांस संसाधन विकास एजन्सी), अरुणाचल प्रदेश

अ. ‘मी आश्रमात तिसर्‍यांदा येत आहे. येथे शिकण्यासारखे आणखी पुष्कळ आहे.

आ. साधनेशी संबंधित प्रत्येक कृतीच्या मागे शास्त्र आहे. हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे.

इ. आपल्या वैदिक संस्कृतीच्या व्यापक हितासाठी प्रत्येक प्रांतात असे संशोधन कार्य व्हायला पाहिजे. जागतिक स्तरावर अशा प्रकारचे सखोल संशोधन कार्य करणे आवश्यक आहे.’

३. श्री. पिंकु कुमार भुईयाँ (सारथी सहायता समिती), हजारीबाग, झारखंड.

अ. ‘आश्रम पाहून आणि सर्व कार्य जाणून घेतल्यावर मनाला शांती जाणवली आणि एक सकारात्मक ऊर्जा स्वतःला मिळत आहे’, असे मला जाणवले.’

४. श्री. मानस सिंग रॉय (सदस्य, भारतीय साधक समाज), हावडा, बंगाल.

अ. ‘पूर्वीच्या तुलनेत आश्रमातील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ झाली आहे’, असे मला जाणवले.

आ. माझ्या मनात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे’, याबद्दलची सकारात्मक भावना जागृत झाली.’

५. डॉ. कौशिकचंद्र मल्लिक (सेवक, शास्त्र धर्मप्रचार सभा), बंगाल

अ. ‘पूर्वीच्या तुलनेत मला आश्रमात पुष्कळ पालट जाणवले. मला ‘सात्त्विकतेत वाढ होत नाही’, असे वाटत होते; मात्र येथील सात्त्विकतेत वाढ झाली आहे.

आ. आश्रमात आल्यानंतर मनातील सर्व विचार थांबतात आणि मन आनंदमय होते. मनातील सर्व शंका आणि पाप नष्ट होते.

इ. येथील शांती उल्लेखनीय आहे.

ई. ‘माझ्या समवेत ईश्वरी तत्त्वही चालत आहे’, असे मला जाणवले.’

६. पं. नीलकंठ त्रिपाठी महाराज (संस्थापक, श्री नीलकंठ सेवा संस्थान), रायपूर, छत्तीसगड.

अ. ‘आश्रमात प्रवेश करताच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि एका दैवी शक्तीची जाणीव होते. आश्रमात प्रवेश करताच शरिराचे जडत्व नष्ट होऊन हलकेपणा जाणवतो.’

७. श्रीमती मीरा पाठक (मिशन सनातन), रायपूर, छत्तीसगड.

अ. ‘आश्रम पहाणे हा जीवनातील अत्यंत सुखद आणि पवित्र असा अनुभव होता. ‘सगळीकडे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे’, असे जाणवले. प्रत्येक ठिकाणी जिवंतपणा दिसला. संयम, सहजता, सेवा, सरळपणा, सजीवता, सकारात्मकता यांचा अद्भुत संगम या स्थानी झाला आहे.’

८. श्री. वेणुगोपाल पगडाला (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय शिवाजी सेना), भाग्यनगर, तेलंगाणा.

अ. ‘आश्रमात उच्च स्तरावरील चैतन्य जाणवले.

आ. ‘आश्रमाभोवती एक प्रभावळ आहे’, असे मला जाणवले.’

(सर्व सूत्रांचा १८.६.२०२३)