स्वतःच्या मनाने कार्य करण्यापेक्षा संतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले, तर ते अधिक चांगले होऊन आध्यात्मिक उन्नतीही होईल !
एक व्यावसायिक आहेत. त्यांना भारतीय भाषेचे महत्त्व लक्षात आले. त्यांच्याशी माझे पुढील संभाषण झाले. – परात्पर गुरु डॉ. आठवले
व्यावसायिक : सध्या एकसुद्धा चांगले कन्नड माध्यमिक विद्यालय नाही. त्यामुळे मी असे एक विद्यालय चालू करीन. सध्या शहरांत सर्व इंग्रजी माध्यमातील विद्यालये आहेत ना !
परात्पर गुरु डॉ. आठवले : माध्यमिक विद्यालय चालू करण्यासाठी किती वर्षे लागतील ?
व्यावसायिक : त्यासाठी एक मोठी जागा पाहिजे. अशी जागा शोधण्यासाठी एक वर्ष लागेल. त्यानंतर ती जागा विकसित करावी लागेल; पण एकाच वेळी संपूर्ण वास्तूची निर्मिती करणे लाभदायी होणार नाही. याचे कारण बालगटातील पहिले विद्यार्थीच कन्नड भाषेतून शिकून पुढच्या पुढच्या इयत्तेत जातील आणि अशा प्रकारे दहावी अन् बारावी पर्यंतच्या इयत्ता वाढत जातील.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हे सर्व साध्य करण्यासाठी किती वर्षे लागतील ?
व्यावसायिक : यासाठी १० – १२ वर्षे लागतील !
परात्पर गुरु डॉ. आठवले : १० – १२ वर्षांनंतर, म्हणजे वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. तेव्हा कर्नाटक राज्यातील प्रत्येक गावात कन्नड माध्यमाचे विद्यालय होईल !
जे आपल्या बुद्धीने विचार करतात, ते म्हणतात, ‘मी हे करीन, मी ते करीन.’ साधना करण्याचा हाच लाभ आहे की, आपण संतांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कृती करतो. त्यामुळे कार्यही चांगले होते आणि आपली आध्यात्मिक उन्नतीही होते.