मुंबई – महाराष्ट्रातील महायुती सरकारने धाडसी निर्णय घेऊन मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांनाी असलेली परकीय नावे पालटून त्यांना स्वदेशी नावे देण्याचा सुत्य निर्णय घेतला आहे. हे अभिनंदनीय आहे. अशाच प्रकारे परकीय आक्रमकांच्या खुणा असलेली नावे अनेक रेल्वे स्थानके, रस्ते, शहर, तालुके, गावे, उद्याने यांना देण्यात आलेली आहेत, ती पालटण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
१. गेली अनेक वर्षे हिंदु जनजागृती समिती ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव), ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलने’ आदी विविध माध्यमांतून परकीय आक्रमकांची नावे पालटण्याची मागणी सातत्याने करत आहे.
सौजन्य:साम
२. गेल्या १ सहस्र वर्षांच्या कालावधीत भारतावर मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आदी अनेक परकीय आक्रमकांनी साम्राज्यविस्तारार्थ आक्रमणे केली. भारतातील अनेक नगरे, वास्तू यांना दिलेली नावे पालटण्यात आली.
३. ७५ वर्षांपूर्वी भारत हे राष्ट्र म्हणून स्वतंत्र झाले; पण पारतंत्र्याच्या या खुणा नगरे, वास्तू, संग्रहालये, रस्ते आदींच्या नावांमधून आजही कायम आहेत. ज्या परकीय आक्रमकांना आम्ही लढा देऊन भारतातून हाकलले आहे, त्यांची नावे भारतातील रस्त्यांना वगैरे का द्यावीत ? त्यांचे उदात्तीकरण कशासाठी ? या गुलामगिरीच्या खुणा अभिमानाने मिरवणे योग्य नाही.
४. परकीय अथवा भारतीय संस्कृतीशी मिळतीजुळती नावे नसल्यामुळे समाजाच्या सांस्कृतिक जीवनविषयीच्या संकल्पनाही पालटतात. भावी पिढीला आपला गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि शौर्य यांची जाणीव होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वदेशी आणि भारतीय संस्कृतीशी मिळतीजुळती नावे देणे आवश्यक आहे.
५. राज्य सरकारने ही ८ रेल्वे स्थानके, तसेच नगर जिल्ह्याचे नाव पालटण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी गतीने कार्यवाही करावी.
६. ‘चर्चगेट’, ‘सांताक्रूझ’, ‘रे रोड’, ‘सीवूडस् दारावे’ आदी अनेक रेल्वे स्थानकांसह दौलताबाद, औरंगपुरा, इस्लामपूर, तसेच टिपू सुलतान अशी अनेक नावे तालुके, गाव, शहरे, रस्ते, उद्यान, चौक आदींना दिलेली आहेत. ती सर्व नावेही पालटण्याची प्रक्रिया शासनाने करावी.
संपादकीय भूमिकामुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची परकीय नावे पालटण्याच्या शासनाच्या निर्णयाचे अभिनंदन ! |