Maulvi Life Imprisonment : मशिदीत १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या मौलवी नसीम खान याला जन्मठेपेची शिक्षा

कोटा (राजस्थान)- मशिदीत अरबी शिकण्यासाठी आलेल्या १० वर्षांच्या निष्पाप मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या  प्रकरणातील दोषी मौलवी नसीम खान याला कोटा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश दीपक दुबे यांनी ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस’(पॉक्सो) या कायद्याच्या अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ५ महिने जुन्या खटल्याचा निकाल देतांना न्यायाधीश दीपक दुबे यांनी लिहिले की, तुझा (पीडित मुलाचा) गुन्हेगार आता कारागृहात आहे आणि तो तुला त्रास देणार नाही.

सरकारी अधिवक्ता ललित कुमार शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने पलवल (हरियाणा) येथील मौलवी (मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते) नसीम खान याला अखेरच्या श्‍वासापर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह त्याला २१ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ते म्हणाले की, धार्मिक नेते असूनही, पवित्र स्थळी चुकीचे कृत्य केल्याविषयी न्यायालयाने आपल्या निर्णयात निष्पाप मुलाविषयी शोक व्यक्त करणारी एक कवितादेखील लिहिली आहे. सुनावणीच्या वेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु न्यायालयाने सांगितले की, या आरोपीला फाशी देणे, हे प्रायश्‍चित नाही, जर तो आयुष्यभर कारागृहात राहिला, तर ते प्रतिदिन त्याच्या पापाचे प्रायश्‍चित असेल.

या प्रकरणी २२ ऑक्टोबर २०२३ या दिवशी पीडित मुलाच्या काकांनी बुधडीत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. तक्रारीत म्हटले होते की, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुतण्या त्यांच्यासमवेत रहात आहे. तो इयत्ता पाचवीत शिकतो. २२ ऑक्टोबर २०२३ या दिवशी सायंकाळी ४ वाजता तो रडत घरी आला. दुपारी ३.३० वाजता तो मशिदीत मौलवीकडे अरबी शिकण्यासाठी गेला होता. तेथे मौलवी नसीम खान याने त्याला काही काळ शिकवले, त्यानंतर मशिदीच्या खोलीत नेऊन त्याचा विनयभंग केला आणि कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी मौलवी नसीम खान याला अटक केली होती.

संपादकीय भूमिका

हिंदूंचे पुजारी, संत आदींवर ऊठसूठ चिखलफे करणारे पुरो(अधो)अधोगामी आता एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !