मौलाना तौकीर रझा याला अटक करून न्यायालयात उपस्थित करण्याचा न्यायालयाचा पोलिसांना आदेश !

वर्ष २०१० मधील बरेली (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार आहे मौलाना तौकीर रझा !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

मौलाना तौकीर रझा खान

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील जलद गती न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांनी इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचा प्रमुख मौलाना तौकीर रझा खान याला अटक करून १३ मार्चपर्यंत न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेश पोलिसांना दिला. वर्ष २०१० मध्ये बरेली येथे झालेल्या दंगलीचा तो मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत न्यायालयाने त्याला चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता. त्याला ही माहिती देण्यासाठी प्रेमनगर आणि कोतवाली पोलिसांनी मौलानाच्या घराच्या अनेक फेर्‍या मारल्या; मात्र तो सापडला नाही. (हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) ही माहिती पोलिसांनी न्यायालयात दिल्यावर न्यायालयाने वरील आदेश दिला.

संपादकीय भूमिका

  • न्यायालयाला असा आदेशका द्यावा लागतो ? पोलीस स्वतःहून आरोपींना अटक का करत नाहीत ? अशा पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !