बंगालमध्ये आम्ही ‘एन्.आर्.सी’ लागू होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

(एन्.आर्.सी म्हणजे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड मैदानावरून तृणमूल काँग्रेसच्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास आरंभ केला. येथे आयोजित सभेला संबोधित करतांना बॅनर्जी म्हणाल्या की, आज मी बंगालच्या ४२ लोकसभा जागांसाठी तृणमूल काँग्रेसचे ४२ उमेदवार घोषित करत आहे. मला या सभेतून भाजपला सांगायचे आहे की, मी बंगाल राज्यात ‘एन्.आर्.सी.’ लागू होऊ देणार नाही. या प्रसंगी तृणमूल काँग्रेसचे लाखो समर्थक उपस्थित होते.

सौजन्य Republic Bharat

संपादकीय भूमिका 

  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून यापेक्षा वेगळी कोणती अपेक्षा करता येईल ?
  • ‘एन्.आर्.सी.’ लागू केले, तर बंगालमधील लाखो बांगलादेशी घुसखोरांना भारतातून बाहेर काढले जाईल. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसची अर्धीअधिक मते अल्प होण्यात होईल. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडून यास प्राणपणाने विरोध होणे, यात काय ते आश्‍चर्य ?