मुंबई – भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणार्या २ आरोपींना सूरत येथून अटक करण्यात आली आहे. मोईन यामीन कुरेशी (वय २३ वर्षे) आणि शाहीद अली शहा (वय १९ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद आहे.
दोन्ही आरोपी आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होते. ५ मार्चला या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका होणार होती. याची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी दोघांना ऑर्थर रोड येथून कह्यात घेतले. त्यानंतर दोघांना पोलीस वाहनातून मुलुंड येथे आणण्यात येत होते. पोलिसांची गाडी घाटकोपरच्या छेडानगर सिग्नलवर येताच दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गाडीतून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी सूरत रेल्वे स्थानकावरून या दोघांना कह्यात घेतले. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकापोलीस समोर असतांना आरोपींनी पळ काढणे हे पोलिसांना लज्जास्पदच ! |