सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप आळशी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !

(अन्न, पाणी, वीज इत्यादींविषयीच्या सिद्धता)

आपत्काळात अन्नधान्य, भाजीपाला, स्वयंपाकाचा गॅस, पाणी, वीज, पेट्रोलसारखी इंधने, नित्योपयोगी वस्तू, घरातील विविध वस्तूंचे सुटे भाग इत्यादींचा प्रचंड तुटवडा भासेल. एकूणच ‘जीवन जगणे’, हे मोठे आव्हान ठरेल. ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते’, या वचनानुसार आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांचे आयुष्य वाचण्यासाठी आजपासूनच ‘दैनंदिन स्तरावर कोणत्या सिद्धता कराव्यात ?’, हे या ग्रंथातून जाणून घ्या !

आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !

(स्वयंसूचना-उपाय, साधनेचे महत्त्व इत्यादी)

आपत्काळाच्या विचाराने अनेकांना मन अस्थिर होणे, चिंता वाटणे, भीती वाटणे इत्यादी त्रास होतात. हे त्रास दूर व्हावेत, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘मनाला कोणत्या स्वयंसूचना द्याव्यात ?’, याचे मार्गदर्शन ग्रंथात केले आहे. कौटुंबिक अन् आर्थिक स्तरांवर करायच्या सिद्धताही ग्रंथात सांगितल्या आहेत. व्यक्तीने साधना करून देवाची कृपा प्राप्त केली, तर देव व्यक्तीचे रक्षण करतोच. यासाठी साधना करण्याचे महत्त्वही ग्रंथात सांगितले आहे.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी http://SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७