Pakistan Blasphemy : पाकिस्तानात महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍या विद्यार्थ्याला फाशीची शिक्षा

अन्य विद्यार्थ्याला जन्मठेपेची शिक्षा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये एका २२ वर्षीय विद्यार्थ्याला प्रेषित महंमद पैगंबर यांचा अवमान केल्यावरून पंजाब प्रांताच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. यासह १७ वर्षांच्या अन्य एका विद्यार्थ्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर अशी छायाचित्रे आणि व्हिडिओ बनवले होते, ज्यात महंमद पैगंबर आणि त्यांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह शब्द होते. १७ वर्षीय विद्यार्थ्याने ही छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित केले होते. पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

संपादकीय भूमिका

भारतात हिंदूंच्या देवता, धर्म, मंदिर आदींवर विविध माध्यमांतून अवमान केला जात असतांना कधीच कुणाला शिक्षा होत नाही, हे लज्जास्पद !