मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने १३६ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्यांना सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली.

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील लोकप्रतिनिधी, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, आधुनिक वैद्य, अधिवक्ता आदी विविध मान्यवरांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. चेंबूर येथील श्री भूलिंगेश्वर मंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला शिवसेनेचे आमदार प्रकाश फाटर्पेकर यांनी भेट दिली. अनेक ठिकाणी पोलीस, व्यापारी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि उत्पादने घेतली. या वेळी त्यांनी ग्रंथ खरेदी केले. सनातन संस्थेच्या साधिका सौ. शर्मिला बांगर बांगर यांनी आमदार प्रकाश फाटर्पेकर  यांना ‘धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान’ हा ग्रंथ भेट दिला.

ग्रंथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती सर्वां पर्यंत पोचवण्याचे महत्कार्य ! – आमदार प्रकाश फाटर्पेकर 

अध्यात्म, संस्कृती, आयुर्वेद , राष्ट्र विषयक आदी विविध विषयांवरील शेकडो ग्रंथांची निर्मिती सनातन संस्थेने केली आहे. विविध भाषांतून ग्रंथांची निर्मिती करून या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे ज्ञान देशातीलच नव्हे, तर जगभरातील जिज्ञासूंपर्यंत पोचत आहे. हे महत्कार्य आहे.

वरळी येथील श्री केदारेश्वर मंदिर येथे शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी भेट दिली. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा महाशिवरात्री विशेषांक भेट देण्यात आला. नवी मुंबई येथील सानपाडा सेक्टर २ मधील ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भेट दिली. त्यांना सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री गणपति’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. रायगड येथील श्री गाडेश्वर मंदिराच्या येथील ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा महाशिवरात्र विशेषांक भेट देण्यात आला.

श्री भूलिंगेश्वर मंदिरात (चेंबूर) ग्रंथ पहातांना पोलीस
आमदार प्रकाश फातर्पेकर यांना ग्रंथ भेट देतांना सौ. शर्मिला बांगर
विशेषांक घेतांना आमदार सुनील शिंदे
विशेषांक घेतांना आमदार प्रशांत ठाकूर