१. भक्तीसत्संगाला आरंभ होण्यापूर्वी मनाला शांत वाटणे आणि खोलीत पंखा चालू नसतांनाही गारवा जाणवणे
‘माझ्या मनात महाशिवरात्रीनिमित्त होणारा भक्तीसत्संग ऐकण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. भक्तीसत्संग चालू होण्याच्या आधी माझ्या मनाला शांत वाटत होते. मी खोलीत बसून भक्तीसत्संग ऐकत असतांना पंखा चालू नसतांनाही मला गारवा जाणवत होता.
२. भक्तीसत्संग चालू झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा प्रत्येक शब्दन्शब्द अंतर्मनात जाऊन शांत वाटणे
भक्तीसत्संग चालू झाला. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ शिवाविषयी सांगत होत्या. त्यांचा प्रत्येक शब्दन्शब्द माझ्या अंतर्मनात जाऊन मला शांत वाटत होते. ‘त्या वेळी मी वेगळ्या लोकात आहे’, असे वाटून मला आनंद जाणवत होता.
३. सत्संगाच्या वेळी मधेमधे झोप येऊनही सत्संगात सांगितलेला सर्व विषय समजणे आणि शिवाचे अस्तित्व सतत जाणवणे
सत्संगाच्या वेळी मला मधेमधे झोप येत होती, तरी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ जे सांगत होत्या, ते सगळे मला समजत होते. इतर वेळी सत्संग चालू असतांना मी झोपले, तर सत्संगात जे सांगितले जाते, ते मी विसरते; पण या भक्तीसत्संगात मला सतत शिवाचे अस्तित्व जाणवत होते.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले शिवाच्या रूपात दिसणे आणि ‘पूर्ण रामनाथी आश्रम शिवाची स्तुती श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मुखातून ऐकत आहे’, असे जाणवणे
मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले शिवाच्या रूपात दिसत होते. त्यांनी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती. मला प.पू. गुरुदेवांपुढे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापुढे) शिवाची पिंडी दिसत होती. ‘मी त्या पिंडीची पूजा करत आहे. शिवपिंडीला पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करत आहे’, असे मला जाणवत होते. ‘पूर्ण रामनाथी आश्रमच शिवाची स्तुती देवीच्या मुखातून, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मुखातून ऐकत आहे’, असे मला सतत जाणवत होते.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना काही वेळा ध्यान लागणे आणि मनात कोणताच विचार न येणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ बोलत असतांना काही वेळा माझे ध्यान लागून ‘मी पूर्णपणे शिवाशी एकरूप झाले आहे’, असे मला वाटत होते. मी डोळे मिटले, तर ‘ते उघडूच नयेत’, असे मला वाटत होते. माझ्या मनात कोणताच विचार येत नव्हता.
६. भक्तीसत्संग संपल्यावर ‘आश्रम म्हणजे कैलास असून, परात्पर गुरु डॉ. आठवले कैलासावर बसून सर्व साधकांचे रक्षण करतात’, असे वाटणे
‘प.पू. गुरुदेव साक्षात् ‘शिव’ आहेत. ते आपल्या जीवनात आले. आपल्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटत होते. भक्तीसत्संग संपल्यावर मी खोलीच्या बाहेर आले. तेव्हा सगळीकडे पांढरा प्रकाश दिसत होता. ‘आश्रम म्हणजे ‘शिवालय’ (कैलास) असून
प.पू. गुरुदेव कैलासावर बसून आम्हा सर्व साधकांचे रक्षण करतात’, असे मला वाटले.
– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |