१. भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘आपण कैलास पर्वतावर आहोत’, असा भावजागृतीचा प्रयोग घेतल्यावर त्याप्रमाणे अनुभवता येणे आणि शरिराचा होत असलेला दाह नाहीसा होणे
‘माझी उष्ण प्रकृती आहे. जसजसा उन्हाळा वाढू लागतो, तसा माझ्या शरिराचा दाह वाढत जातो. मला दाह सतत जाणवत असतो. ११.३.२०२१ या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘आपण कैलास पर्वतावर आहोत’, असा भावजागृतीचा प्रयोग घेतला. त्या वेळी श्री गुरूंच्या कृपेने मला तसे अनुभवता आले. त्या वेळी माझ्या शरिराचा होत असलेला दाह पूर्णपणे थांबलेला होता. सत्संग संपल्यानंतरही पुढील एक घंटा मला ही स्थिती अनुभवता आली. श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !
२. ‘पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले शिवतत्त्व अनुभवूया’, असा भावजागृतीचा प्रयोग करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. महाशिवरात्रीच्या भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘आज पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले शिवतत्त्व अनुभवूया’, असे सांगितले. त्या वेळी श्री गुरूंच्या कृपेने ‘घरातील दोन खोल्यांमध्ये सनातन-निर्मित शिवाच्या चित्रातील शिवाच्या देहाच्या रंगाप्रमाणे पारदर्शी प्रकाश संपूर्ण खोलीत पसरलेला आहे’, असे मला जाणवले.
आ. त्या वेळी मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. माझे शरीर काचेप्रमाणे पारदर्शक झाले होते. माझ्या शरिरात शिवाचा निळा रंग संपूर्णपणे सामावलेला होता.
इ. मला पुष्कळ आनंद होत होता. माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
ई. ‘हलाहल प्राशन करून पृथ्वीवरील जीवसृष्टीला जीवनदान देणार्या नीलकंठ महादेवाप्रमाणे साधकांचे सगळे त्रास स्वतः सहन करून साधकांना जीवनदान देणारे, ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढणारे, समाजातील रोषरूपी विष धारण करून समाज उद्धारासाठी सत्संगरूपी अमृत देणारे प.पू. डॉक्टर आमच्यासाठी शिवच आहेत’, असे मला दिवसभर जाणवत होते.
मला या अनुभूती दिल्याबद्दल मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– एक साधिका, नागपूर
|