संपादकीय : सलाम यांचे खडे बोल !

अब्दुल सलाम

केरळमधील मल्लप्पूरम् मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अब्दुल सलाम यांनी भारतीय मुसलमानांचे कान टोचले आहेत. ‘भारतीय मुसलमान हे सौदी अरेबियातील मुसलमानांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत’, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या वक्तव्यात बरेच तथ्य आहे. भारतात मुसलमान सुरक्षित आहेतच; मात्र ‘त्यांच्या कारवायांमुळे येथे बहुसंख्य असणार्‍या हिंदूंना असुरक्षित वाटते’, हेही तितकेच खरे !  जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद, भूमी जिहाद आदी कारवायांमध्ये गुंतलेले धर्मांध मुसलमान हिंदूंच्या जिवावर उठले आहेत. एवढे असूनही स्वतः ‘पीडित’ असल्याचा आव आणून हे लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अपकीर्ती करतात. त्याचा परिणाम अमेरिकेकडून प्रसारित करण्यात येणार्‍या मानवाधिकार अहवालांमध्ये दिसून येतो. ‘भारतात दिवसेंदिवस अल्पसंख्यांकांवर होणारी आक्रमणे वाढत आहेत’, ‘भारतात मानवाधिकार धोक्यात आहे’, अशी सूचना या संस्थेकडून दिली जाते. हा अहवाल बनवणारे तळागाळापर्यंत जाऊन तत्त्वनिष्ठपणे तो सादर करतात का ? हा एक अभ्यासाचा विषयच आहे. अशा संस्थांनी सर्वेक्षण करण्यासाठी नेमलेली मंडळीसुद्धा हिंदुद्वेषी आणि अल्पसंख्यांकधार्जिणी असतात, हे वेगळे सांगायला नको. या पार्श्वभूमीवर सलाम यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे.

सौदी अरेबिया या देशाला ‘इस्लामचे माहेरघर’ संबोधले जाते. येथूनच जगभर इस्लामचा प्रचार झाला. या देशात मुसलमानांची स्थिती काय आहे ? तेथे मुसलमानांना व्यक्तीस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य नाही. एवढेच कशाला ? तर तेथे आंदोलने करणे, मोर्चा काढणे यांवरही बंदी आहे. अशी बंधने भारतातील मुसलमानांना आहेत का ? नाही; पण तरीही भारतातील निधर्मीवादी, सुधारणावादी आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून मुसलमानांविषयी धादांत खोटी माहिती प्रसारित केली जाते. यामुळेच सलाम यांची मते भारतातील मुसलमानांसाठी महत्त्वाची आहेत. सलाम हे काही मुरलेले राजकारणी नाहीत. ‘त्यांचे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित आहे’, असे कुणाच्या मनात येऊ शकेल; मात्र तसे काही नाही. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत जी १९५ उमेदवारांची सूची घोषित केली आहे, त्यांतील सलाम हे एकमेव मुसलमान उमेदवार आहेत. ते शिक्षणक्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते कोळीकोड विद्यापिठाचे माजी कुलगुरु होते. त्यांनी आतापर्यंत १५३ शोधनिबंध लिहिले आहेत, तसेच त्यांची आतापर्यंत १५ पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. हे येथे मुद्दामहून नमूद करण्याचे कारण की, भारतात जे काही तुरळक विचारी आणि विवेकी मुसलमान आहेत, त्यांपैकी अब्दुल सलाम हे एक आहेत. सलाम यांच्यासारख्या सुधारणावादी मुसलमानांच्या मतांना त्यांचे धर्मबांधव किंमत देत नाहीत. एवढेच कशाला ? भारतातील मुसलमानधार्जिणेही सलाम यांनी मांडलेल्या विचारांकडे दुर्लक्ष करतात. यात सुधारणावाद्यांचा स्वार्थ दडलेला असतो. त्यामुळे आता समाजानेच सलाम यांच्यासारख्या सुधारणावाद्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक !