मानससरोवर आणि कैलास पर्वत यांचे वर्णन ऐकतांना सरोवराच्या काठी शिव-पार्वती बसलेले दिसणे

कु. नंदिता वर्मा

‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त विशेष भक्तीसत्संग झाला. या भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या कैलासाखाली वहाणार्‍या मानससरोवर आणि कैलास पर्वत यांचे वर्णन करत होत्या. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने मला त्या सरोवराच्या काठी शिव-पार्वती बसलेले दिसले. त्या मानससरोवरामध्ये दोन पांढरे हंस विहार करतांना दिसले. हे दृश्य इतके मनोहर होते की, आतून मला पुष्कळ आनंद जाणवत होता आणि मी शिवलोकात असल्यासारखे जाणवले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई शिवाचे वर्णन करत असतांना मला भस्माचा सुगंध आला.’

– कु. नंदिता वर्मा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक