आपत्काळाच्या संदर्भात सेवेची काळजी न करता वर्तमानात प्राधान्य ठरवून सेवा करत रहावी !
सौ. शुभांगी : मी करत असलेली एक सेवा किचकट आहे आणि तिला पुष्कळ कालावधीही लागणार आहे. त्या सेवेविषयीचा तपशीलही / माहितीही बरीच जुनी आहे. त्यामुळे मला पूर्वी काळजी वाटायची. ‘आपत्काळ चालू होण्यापूर्वी ती सेवा पूर्ण होईल ना ? आपण आहोत, आपल्याला सुचत आणि आठवत आहे, तोपर्यंत ती सेवा झालेली बरी ! पुढे आपल्यानंतर कुणाला ती सेवा करायची झाली, तर त्याला ती कळणारच नाही.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : ती काळजी करायला नको. आपल्याला जेवढे करता येईल तेवढे करायचे. ईश्वराच्या इच्छेप्रमाणे होईल. ईश्वराला सेवेविषयीचा तो तपशील / माहिती नष्ट करायची असेल ती ईश्वर नष्ट करील. ‘आपल्याला सगळा तपशील / माहिती मिळायला हवी’, असा विचार करायला नको; पण आपण प्राधान्य ठरवून सेवा करत रहायला हवी.’