संदेशखाली येथील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकारकडून बळाचा वापर ! – पंतप्रधान मोदी

कोलकाता – बंगालमध्ये गरीब आदिवासी महिलांवर अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथील आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. हे अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकार बळाचा वापर करत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल दौर्‍याच्या वेळी केले. कोलकाता येथे त्यांनी १५ सहस्र ४०० कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन केले. त्यानंतर मोदी यांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बारासात येथे भाजपच्या नारी शक्ती अभिनंदन सभेला संबोधित केले.

सौजन्य The Economic Times

पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले,

१. संदेशखाली येथील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख याच्यावर बलात्कार आणि भूमी बळकावल्याचा आरोप केला आहे.

२. बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार केंद्र सरकारच्या योजना राज्यात लागू करू देत नाही. राज्यात महिला सुरक्षा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, उज्ज्वला योजना, स्वस्त सिलिंडर योजना इत्यादी योजना राबवण्यात आल्या नाहीत.

३. तृणमूल काँग्रेसची माफिया राजवट नष्ट करण्यासाठी बंगालची महिला शक्ती पुढे सरसावली आहे.