Indian Navy Near Maldives : भारतीय नौदलाच्या मालदीवच्या जवळील सैन्य तळाचे ६ मार्चला उद्घाटन

नवी देहली – भारत आणि मालदीव यांच्यातील चीनमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने लक्षद्वीप येथील बेटावर सैन्य तळ उभारले आहे. येत्या ६ मार्च या दिवशी या तळाचे उद्घाटन होणार आहे. हे तळ मालदीव पासून २५० किलोमीटर अंतरावर आहे. याद्वारे मालदीवमधील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. या संदर्भात भारतीय नौदलाने म्हटले आहे की, सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या बेटांवर सैन्याला बळ देण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.

भारताचा लक्षद्वीप हा भूभाग मालदीवच्या उत्तरेस सुमारे १३० किमी अंतरावर आहे. लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर हे नवे सैन्य तळ असणार आहे. भारतीय नौदलाचे याआधीच लक्षद्वीपच्या कावरात्ती बेटावर एक सैन्य तळ आहे; मात्र नवे सैन्य तळ मालदीवच्या आणखी जवळ असणार आहे.