न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घातलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने कॅनडातील भारताचे राजदूत संजय कुमार वर्मा यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. वर्मा अमेरिकेतील ब्रिटीश कोलंबिया प्रांताला भेट देणार असून या भेटीच्या वेळी ते सरे शहरालाही भेट देणार आहेत. या संघटनेचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याने धमकीच्या मेलमध्ये म्हटले आहे की, खलिस्तान समर्थकांना सरेमध्ये वर्मा यांना लक्ष्य करण्याची थेट संधी आहे.
१. धमकीची माहिती मिळाल्यानंतर भारतीय राजदूतांनी यासंदर्भात कॅनडाच्या अधिकार्यांना कळवले आहे. अधिकार्यांनी त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.
US based #Khalistani terrorist, Gurpatwant Singh Pannu threatens to assassinate Indian High Commissioner to #Canada
A Khalistani terrorist, who is a U.S. citizen, openly threatens to kill the Indian High Commissioner and the U.S. watches passively. @DrSJaishankar should… pic.twitter.com/Ry7dQwEX98
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 2, 2024
२. सरेमध्येच १८ जून २०२३ या दिवशी गुरुद्वाराच्या वाहनतळामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याची हत्या करण्यात आली होती. भारत सरकारच्या आदेशाने ही हत्या झाल्याचा पन्नू याचा आरोप आहे. या हत्येचा सूड घेण्याची संधी वर्मा यांच्या भेटीच्या रूपाने आली असल्याचे पन्नू याचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिका
|