कलियुगात वाईट शक्तींच्या त्रासाविषयी समाज अनभिज्ञ आहे. आम्हा साधकांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे वाईट शक्तींच्या सूक्ष्म जगताविषयी ज्ञात झाले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. १९ फेब्रुवारी या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज सूक्ष्म परीक्षण याविषयी पाहूया.
या लेखामलेचा भाग २ बघण्याकरिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/766136.html
(भाग ३)
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील जाणणार्या साधकांना ‘सूक्ष्म परीक्षण कसे करायचे ?’, हे शिकवणे
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातील जाणणार्या आम्हा साधकांना ‘सूक्ष्म परीक्षण’ कसे करायचे ?’, हे शिकवले. ते म्हणाले, ‘‘सूक्ष्म परीक्षण करतांना प्रथम देवाला प्रार्थना करायची. त्यानंतर ‘ज्या साधकाचे सूक्ष्म परीक्षण करायचे आहे, त्याला त्रास आहे किंवा नाही ?’, हे स्वतःच्या मनाला विचारायचे. मनात प्रथम येणारे उत्तर गृहीत धरून साधकाच्या त्रासाचे प्रमाण ठरवायचे.’’ ‘ते कसे ठरवायचे ?’, याचा क्रमही त्यांनी सांगितला.
१ अ. साधकाचे वाईट शक्तीच्या त्रासाच्या संदर्भात सूक्ष्म परीक्षण करतांना मनाला (देवाला) प्रश्न विचारण्याचा क्रम
१. साधकाला त्रास आहे किंवा नाही ?
उत्तर : आहे. (‘आहे’, असे उत्तर आल्यास)
२. साधकाचा त्रास शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक स्वरूपाचा आहे आणि त्यांचे प्रमाण किती टक्के आहे ?
उत्तर : शारीरिक त्रास ४० टक्के + मानसिक त्रास ३० टक्के + आध्यात्मिक ३० त्रास टक्के = एकूण १०० टक्के
३. साधकाच्या त्रासावर आध्यात्मिक उपाय कोणता ?
उत्तर : साधकाच्या त्रासावर उपाय म्हणून त्याला कोणत्या देवतेचा नामजप करायचा, जप करतांना कोणती मुद्रा आणि न्यास करायचे, तसेच उपायांचा कालावधी सांगणे.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना त्रासांचे वर्गीकरण करायला शिकवणे आणि त्रासाच्या तीव्रतेनुसार नामजप शोधून देण्यास आरंभ करणे
अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला साधकाचा त्रास शोधतांना त्याच्या त्रासाचे वर्गीकरण ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक’, या ३ भागांत करायला शिकवले. त्यानंतर आम्ही साधकाला होणार्या त्रासाच्या तीव्रतेनुसार साधकांना ‘कोणता नामजप करायचा, त्याचा कालावधी आणि तो किती दिवसांसाठी करायचा ?’, हे शोधून देण्यास आरंभ केला.
३. ‘आम्ही साधकांचे केलेले सूक्ष्म परीक्षण योग्य आहे कि नाही ?’, हे परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला सांगत असत.
अशा प्रकारे ‘सूक्ष्म परीक्षण’ या एका नव्या संकल्पनेचा उदय झाला.’ (क्रमशः)
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२२)
|