Halal Ban At Medaram Jatara : मेडाराम (तेलंगाणा) जत्रेत हलाल पद्धतीने पशूबळी देऊ नये ! – मुख्य पुजार्‍यांचे आवाहन

मंदिराचे मुख्य पुजारी सिद्दबोयिना अरुण कुमार

मंगा पेटा (तेलंगाणा) – मेडाराम येथे होणार्‍या सम्मक्का-सारालक्का देवीच्या जत्रेेमध्ये हलाल पद्धतीने पशूबळी देण्यास आल्यास ते संप्रदायाच्या परंपरांच्या विरोधात असेल आणि  देवीही ते स्वीकारणार नाही, असे मंदिराचे मुख्य पुजारी सिद्दबोयिना अरुण कुमार यांनी सांगितले आहे. सामाजिक माध्यमांतून त्यांनी या संदर्भातील व्हिडिओ प्रसारित केला आहे.

१. या व्हिडिओमध्ये सिद्दबोयिना अरुण कुमार यांनी म्हटले आहे की, जे बळी देण्यासाठी येतात, त्यांनी आदिवासींच्या आचारांचे आदर करत त्याचे पालन केले पाहिजे. ‘बळी देण्यासाठी येणार्‍या भक्तांनी या आचारांचा अवमान करू नये’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

२. गेल्या अनेक दशकांपासून मेडाराम जत्रा आयोजित केली जात आहे. या यात्रेत १ कोटीहून अधिक भक्त येण्याची शक्यता आहे. येथे वनवासी देवतेच्या रूपामध्ये सम्मक्का आणि सारालक्का यांची पूजा केली जाते. भक्त येथे नैवेद्याच्या रूपात बकरा आणि कोंबडी यांचा बळी देतात. यावर्षी ही यात्रा २१ ते २४ फेब्रुवारी या काळात आयोजित करण्यात आली आहे.

‘हलाल’ पद्धतीने पशूबळी कसा दिला जातो ?

हलाल पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वहाते आणि नंतर त्या प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरांच्या धार्मिक जत्रेत हलाल पद्धतीने पशूबळी दिले जाणे, हे हिंदूंना धर्मशिक्षणाचा अभाव असल्याचेच दर्शक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदु संघटनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !