‘इन्स्टाग्राम स्टेटस’वर टीपू सुलतान आणि औरंगजेब यांची चित्रे ठेवल्यावरून निहालच्या विरोधात गुन्हा नोंद !

  • स्टेटसमध्ये ‘बाप तो बाप रहेगा’ असे गीत !

  • सांगली येथील घटना !

सांगली, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – क्रूरकर्मा टीपू सुलतान आणि औरंगजेब यांची चित्रे ‘इन्स्टाग्राम स्टेटस’वर ठेवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी निहाल असीफ बावा याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी सांगलीवाडी येथील अनिकेत कुंभार यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. १८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३० वाजता हा स्टेटस ठेवल्याचे लक्षात आले. १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर असा व्हिडिओ ठेवून हिंदू-मुसलमान यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा धर्मांध मुसलमान प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

निहाल याने इन्स्टाग्रामवर Ubed-pathan७८६_ या खात्यावरून क्रूरकर्मा टीपू सुलतान आणि औरंगजेब यांची चित्रे ठेवून ‘बाप तो बाप रहेगा’ असे गाणे लिहिलेला व्हिडिओ त्याच्या ‘स्टेटस’ला ठेवला. या गाण्यावर एक व्यक्ती नाच करत असल्याचे यात दिसत आहे.

अनिकेत कुंभार यांना हे लक्षात येताच त्यांनी त्यांचा मित्र वैभव कोळी यांना सर्व प्रकार सांगून तो व्हिडिओ त्यांच्याही भ्रमणभाषवर दिसतो का ? ते पहाण्यास सांगितले. या वेळी वैभव यांच्यासह त्यांचे मित्र राहुल बोळाज, प्रथमेश मुळे आणि अनिकेत अमृळे यांनाही हा व्हिडिओ असल्याचे निदर्शनास आले.

संपादकीय भूमिका 

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. अशांवर जरब बसेल, अशी कारवाई केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !