न्हावा शेवा बंदरात ४० मेट्रिक टन चिनी बनावटीचे फटाके जप्त !

  • नवी मुंबई येथे सीमाशुल्क विभागाची कारवाई !

  • फटाक्यांची तस्करी उघड !

मुंबई – नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत ४० मेट्रिक टन चिनी बनावटीचे फटाके जप्त करण्यात आले. त्यांची किंमत ११ कोटी रुपये आहे. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे ब्रश आणि मॉप यांच्या नावाने फटाक्यांची तस्करी करण्यात येत होती.

या फटाक्यांमध्ये वापरण्यात येणार्‍या जस्त आणि लिथीयम यांच्या अधिक मात्रेमुळे श्‍वसनाचे आजार होऊ शकतात. असे असतांनाही त्यांचा वापर केला जातो.

संपादकीय भूमिका 

शत्रूराष्ट्र असणार्‍या चीनच्या फटाक्यांची भारतात तस्करी होणे संतापजनक ! असे करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !