श्रीराममंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने…
‘आपली पिढी ही अशी आहे की, आपल्याला श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा पहायला मिळत आहे. हा दिवस पहाण्यासाठी यापूर्वी कित्येक पिढ्यांनी प्राणांचे बलिदान केले आहे. त्यांच्या प्रतीही आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपण अशा वेळी जन्म घेतला की, श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पहाण्याची संधी आपल्याला मिळत आहे. जेव्हा प्रभु श्रीरामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत आले होते, तेव्हा नगरवासियांनी तो दिवस ‘एक उत्सव’ म्हणून साजरा केला होता. तसाच उत्सव अयोध्यावासियांसह संपूर्ण देशाने साजरा केला.
प्रभु श्रीरामचंद्राने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला होता, त्याप्रमाणे हिंदु समाजाचा हा विजय आहे. श्रीरामाचे मंदिर बनले आहे; पण आपल्याला त्यासमवेतच एका अतीउत्तम अशा रामराज्याच्या संकल्पनेकडे जायचे आहे. जेव्हा प्रभु श्रीराम अयोध्येत आले होते, तेव्हाच रामराज्याचाही आरंभ झाला होता. त्याप्रमाणे श्रीराममंदिराच्या समवेतच रामराज्यासम हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्नरत रहावे.
– सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती. (२१.१.२०२४)