अमृतमय वाणीमुळे साधकांच्या मनात भावभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यदायी भक्तीसत्संग !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आम्हा साधकांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यदायी भक्तीसत्संग प्रत्येक आठवड्याला ऐकायला मिळतो. ‘आम्ही साधक परम भाग्यवान आहोत; कारण हा भक्तीसत्संग ऐकतांना आम्ही आपोआप भावविश्वात जातो. आमच्या अंतर्मनातही भावभक्तीच्या स्तरावर आपोआप पालट होतात’, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्हा साधकांकडे शब्दच नाहीत. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अमृतमय वाणीतून भक्तीसत्संग ऐकतांना चैतन्य आणि आनंद यांची उधळण होते’, असे मला जाणवत असते. हा सत्संग, म्हणजे सर्वांसाठी महापर्वणीच आहे. हा सत्संग ऐकतांना मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, म्हणजे भूदेवीच बोलत आहेत’, याची जाणीव अखंड होत असते. (‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या ‘भूदेवी’ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘श्रीदेवी’ आहेत.’ – संकलक) प्रत्येक आठवड्याला होणार्‍या या भक्तीसत्संगातून मिळत असणार्‍या शब्दातीत ज्ञानामृताचे वर्णन शब्दांमध्ये करणे अशक्य आहे. गुरुदेवांच्या कृपेने मला भक्तीसत्संगाविषयी जे काही जाणवते, ते त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ बोलत असतांना ‘त्यांच्या अमृतमय वाणीतून चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे. त्यांचा एकेक शब्द हा केवळ शब्द नसून भावमोती आणि चैतन्यमोती आहे’, असे मला जाणवते.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे मन, भाव आणि कृती यांच्या स्तरावर जाणवणारे पालट  

वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील

२ अ. मनाच्या स्तरावर जाणवणारे पालट

२ अ १. मन निर्विचार स्थितीत जाणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ घेत असलेला भक्तीसत्संग ऐकतांना माझे मन आपोआप निर्विचार अवस्थेत जाते. एरव्ही मनातील विचार न्यून करणे अशक्य असते; परंतु सत्संगात मनातील विचार न्यून करण्यासाठी मला विशेष काही प्रयत्न करावे लागत नाहीत.

२ अ २. मन तृप्त होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीतून मिळणार्‍या चैतन्याचे अमृतपान केल्यानंतर माझे मन तृप्त होते. मला आतून पुष्कळ समाधान वाटते. या समाधानाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

२ अ ३. सत्संगानंतर कितीतरी वेळ माझ्या मनात मायेतील किंवा अन्य विचार येत नाहीत. माझे मन एका वेगळ्याच शांतीच्या अवस्थेत असते.

२ आ. भावाच्या स्तरावर जाणवणारे पालट

२ आ १. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सत्संगामध्ये ‘वंदन’, ‘गुरुस्मरण’, असे अनेक शब्द वापरतात. त्या त्या शब्दातून ऐकणार्‍याच्या मनात तो तो भाव निर्माण होतो.

२ आ २. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे बोलणे एका लयीत आणि भावाच्या स्तरावर असल्यामुळे ‘त्यांचे बोलणे थांबूच नये, अखंड ऐकत रहावे’, असे मला वाटते.

२ आ ३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘मनमंदिरामध्ये गुरुपादुका स्थापन करूया’, असे म्हटल्यावर सूक्ष्मातून मन मंदिरासारखे होऊन तिथे गुरुपादुका दिसणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘मनमंदिर’ हा शब्द उच्चारल्यावर मला स्वतःच्या मनात सूक्ष्मातून मंदिर दिसायला लागते आणि त्यांनी ‘मनमंदिरामध्ये गुरुपादुका स्थापन करूया’, असे म्हटल्यावर मनमंदिरात गुरुपादुका दिसायला लागतात. तेव्हा ‘त्या पादुकांकडेच पहात रहावे’, असे मला वाटते.

२ आ ४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ गुरुभक्तीचे वर्णन करत असतांना गुरूंविषयीची कृतज्ञता दाटून येणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ गुरुभक्तीचे वर्णन करत असतांना माझ्या मनामध्ये गुरूंविषयीचा कृतज्ञताभाव आपोआप निर्माण होतो. त्या वेळी गुरूंविषयीची कृतज्ञता दाटून येते. ‘गुरु आपल्यासाठी किती करतात !’, याची मला जाणीव होते. ‘महाविष्णुस्वरूप नारायणाचे अवतार असलेले परात्पर गुरु डॉक्टरांसारखे गुरु आपल्याला लाभले आहेत’, असा भाव मनात निर्माण झाल्यानंतर माझ्या मनातील भय आणि चिंता नाहीशा होतात.

२ आ ५. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भावार्चना घेत असतांना सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांचे चरण आपोआप डोळ्यांसमोर येणे : भक्तीसत्संगाच्या प्रारंभी किंवा मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भावार्चना घेतात. तेव्हा त्यांनी ‘आपण परात्पर गुरुदेवांच्या चरणांवर नतमस्तक होऊया’, असे म्हटल्यावर सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांचे चरण आपोआप माझ्या डोळ्यांसमोर येतात. त्या वेळी ‘आपण खरोखरच गुरुदेवांच्या चरणांवर नतमस्तक झालो आहोत’, असे मला जाणवते. एरव्ही मला परात्पर गुरुदेवांचे चरण आठवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

२ इ. कृतीच्या स्तरावर जाणवणारे पालट

२ इ १. ‘सण किंवा उत्सव आध्यात्मिक स्तरावर कसे साजरे करायचे ?’, हे सांगून सर्वांना त्यातील खरा आनंद अनुभवायला देणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ भक्तीसत्संगात सण किंवा उत्सव यांच्या आधी ‘तो सण किंवा उत्सव आध्यात्मिक स्तरावर कसा साजरा करायचा ?’, हे सांगतात आणि साधक त्याप्रमाणे कृती करून सणांचा आध्यात्मिक स्तरावरील आनंद अनुभवतात, उदा. ‘दीपावली आध्यात्मिकदृष्ट्या कशी साजरी करावी ?’, हे त्यांनी दीपावलीच्या आधी सांगितले. त्यानंतरच्या सत्संगात त्यांनी साधकांना त्याविषयी विचारल्यानंतर साधकांनी त्यांचे अनुभव सांगितले. तेव्हा ‘सर्वांना दिवाळीचा खरा आनंद घेता आला’, असे मला जाणवले.

२ इ २. घर रामनाथी आश्रमाप्रमाणे बनवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगून घरातील सात्त्विकता वाढण्यासाठी साहाय्य करणे : एका भक्तीसत्संगात त्यांनी ‘आपले घर रामनाथी आश्रमाप्रमाणे सात्त्विक कसे बनवायचे ?’, याविषयीची सूत्रे सांगितली होती. त्याप्रमाणे साधकांनी ‘घरात स्वच्छता करणे, तसेच मन आनंदी ठेवणे’, हे प्रयत्न केल्यानंतर त्यांना घरामध्ये सात्त्विकता वाढल्याचे जाणवले.

२ इ ३. भक्तीसत्संगात सांगितल्याप्रमाणे साधकांकडून भाववृद्धी किंवा अहं-निर्मूलन यांसाठी प्रयत्न आपोआप होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगामध्ये भाववृद्धी किंवा अहं-निर्मूलन यांसाठी प्रयत्न करण्यास सांगितल्यास साधकांकडून तसे प्रयत्न आपोआप होऊ लागतात. ‘त्यांचे शब्द ब्रह्मांडाच्या पोकळीतून येत असून ते अत्यंत हलके आहेत’, असे मला वाटते आणि ते सहजपणे अंतर्मनात जाऊन पालट होण्याची प्रक्रिया होते.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीतील भक्तीसत्संगाच्या वेळी अनुभवलेले क्षणमोती !

३ अ. द्रौपदीच्या श्रीकृष्णभक्तीविषयीचे प्रसंग ऐकतांना ‘आपण द्वापरयुगातील वातावरणाची अनुभूती घेत आहोत’, असे जाणवणे : ‘रक्षाबंधना’च्या दिवशी असलेल्या भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ द्रौपदीच्या श्रीकृष्णाप्रतीच्या भक्तीविषयी सांगत होत्या. तेव्हा त्या प्रसंगांचे वर्णन ऐकतांना ‘आपण द्वापरयुगातील वातावरणाची अनुभूती घेत आहोत’, असे मला जाणवले. ‘जणू ते सर्व प्रसंग आपल्या समोरच घडत आहेत आणि आपण त्यांतील एक भाग आहोत’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘त्या सांगत असलेला प्रसंग आणि त्या वेळचे वातावरण दृश्य स्वरूपात उभे करण्याची क्षमता श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या अमृतमय वाणीत आहे’, हे माझ्या लक्षात आले.

३ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची अमृतमय वाणी ऐकल्यावर वातावरणात पालट होणे आणि यावरून ‘त्या प्रत्यक्ष भूदेवी आहेत’, हे अनुभवायला मिळणे : सत्संग चालू असेपर्यंत वातावरणात पालट जाणवत असतो. हा पालट सत्संग ऐकणार्‍या सर्व साधकांना जाणवतो. हे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या अमृतमय वाणीचे वैशिष्ट्य आहे. आपण कुठेही असू, त्यांची अमृतमय वाणी ऐकल्यानंतर वातावरणात पालट होतात. यावरून ‘त्या साक्षात् भूदेवी आहेत’, हे अनुभवायला मिळते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटते.

४. नवरात्रीत झालेल्या ‘विशेष भक्तीसत्संगां’च्या वेळी जाणवलेली सूत्रे

४ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘देवीचे रूप डोळ्यांसमोर आणूया’, असे म्हटल्यावर ‘प्रत्यक्ष देवी समोरच उभी आहे’, असे जाणवणे : वर्ष २०२० मधील नवरात्रीत ९ दिवस श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘विशेष भक्तीसत्संग’ घेतले होते. त्यांमध्ये त्यांनी प्रतिदिन एकेका देवीची माहिती सांगितली. सत्संगाच्या प्रारंभी त्यांनी ‘देवीचे नाव घेऊन तिचे रूप डोळ्यांसमोर आणूया’, असे म्हटल्यावर ‘प्रत्यक्ष देवी समोरच उभी आहे’, असे जाणवायचे. त्यामुळे नवरात्रीच्या ९ दिवसांत आम्हाला देवीचे सूक्ष्मातून दर्शन झाले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी देवीला प्रार्थना केल्यामुळेच देवीने सर्वांना दर्शन दिले. अशा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

४ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी देवींची गुणवैशिष्ट्ये सांगितल्यामुळे ‘देवीचा भक्तांप्रती असलेला वात्सल्यभाव, करुणा आणि प्रीती’ प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी वेगवेगळ्या देवींची गुणवैशिष्ट्ये सांगितल्यामुळे माझ्या मनामध्ये त्या त्या देवीविषयी पुष्कळ प्रेम निर्माण झाले. त्या वेळी ‘साक्षात् एक देवी (श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ) दुसर्‍या देवीची स्तुती करत आहे’, असे मला जाणवत होते. त्यांनी देवीच्या तारक रूपाच्या समवेतच तिच्या मारक रूपाचे वर्णन केल्यामुळे देवीचे मारक रूप माझ्या डोळ्यांसमोर येत असे. तेव्हा मला ‘देवीचा भक्तांप्रती असलेला वात्सल्यभाव, करुणा आणि प्रीती’ प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होती.

४ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘देवता भक्तांवर किती प्रेम करतात !’, हे सांगितल्यावर ‘आम्हीच देवतांची भक्ती करायला न्यून पडतो’, असे मला जाणवले.

५. या सूत्रांचे टंकलेखन करत असतांना ‘भक्तीसत्संगात असल्याप्रमाणे मन शांत होऊन माझ्या संपूर्ण शरिरात चैतन्य पसरत आहे’, अशी अनुभूती मला आली.

६. कृतज्ञता आणि प्रार्थना !

उच्च कोटीच्या अनुभूती देणार्‍या भूदेवी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः प्रणाम आणि कोटीशः कृतज्ञता ! श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना उत्तराधिकारी म्हणून नेमल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

‘परात्पर गुरुदेव, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आध्यात्मिक शक्तीचा आम्हा सर्व साधकांना लाभ करून घेता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.