नाम स्मरा हो नाम स्मरा ।
गुरुरायांचे चरण धरा ।। १ ।।
मनोभावे भक्ती करा ।
देव येईल तुमच्या घरा ।। २ ।।
आनंदाने त्यासी स्मरा ।
त्यातून जीवन आनंदी करा ।। ३ ।।
आनंदातून पाप हरा ।
मोक्षपदाचा मार्ग धरा ।। ४ ।।
गुरुभक्ती असे दाट ।
गुरुच दावी मोक्षाची वाट ।। ५ ।।
या रे या, सारे या, गुरु भजनात दंग होऊया ।
या रे या, सारे या, गुरु भजनात दंग होऊया ।। ६ ।।
– श्री. सुरेश दाभोळकर, ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |