Uttarakhand Land Jihad : उत्तराखंडमध्ये ‘लँड जिहाद’द्वारे बळकावलेली ५ सहस्र एकर भूमी मुक्त !

भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली माहिती

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

नवी देहली – उत्तराखंडमधील ५ सहस्र एकरहून अधिक भूमी लँड जिहादद्वारे बळकावण्यात आली होती. ती सर्व भूमी सरकारने मुक्त केली आहे. अद्यापही या संदर्भात कारवाई चालू आहे, अशी माहिती उत्तराखंडमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात दिली.

मुख्यमंत्री धामी पुढे म्हणाले की, देवभूमी उत्तराखंडमध्ये आम्ही अनेक आव्हानात्मक कामे करण्यासाठी श्रीरामाच्या कृपेने प्रयत्न केले आहेत. आम्ही कठोर निर्णय घेऊन अतिक्रमणे हटवली आहेत. याद्वारे देवभूमीचे मूळ स्वरूप कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत. मे २०२३ पर्यंत राज्यात लँड जिहादद्वारे ३ सहस्र ७९३ ठिकाणांवर अतिक्रमण करण्यात आल्याची माहिती गोळा करण्यात आली होती. यात मुसलमानांची अनधिकृत थडगी (मजार) यांची संख्या सर्वाधिक होती.

संपादकीय भूमिका

उत्तराखंड सरकार असे करू शकते, तर देशातील अन्य सरकारे का करू शकत नाहीत ? केंद्र सरकारच्या भूमींवरही देशभरात अतिक्रमणे झाली आहेत, त्यांनीही त्या मुक्त करणे आवश्यक आहे !