१. इस्लामी देशात भारताचा वाढता दबदबा !
पाकने भारताविरुद्ध इस्लामी देशांमध्ये कितीही लॉबिंग केले, तरी ते देश आता त्यामध्ये फसणार नाहीत. इस्लामी देशांचे केंद्र असणार्या पश्चिम आशियात इतिहासात पहिल्यांदाच जगातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर बांधले जात आहे. त्यासाठी संयुक्त अमिरातीने (यूएईने) दुबई-अबुधाबी रस्त्यावर १७ एकर जागा दिली आहे.
२. अमेरिका आणि पश्चिमी देश यांची दुटप्पी भूमिका उघड !
खलिस्तानी कार्यकर्त्यांची अमेरिका आणि युरोप येथे भारतियांवर आक्रमणे वाढली आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत संधू यांच्यावर आक्रमण करण्यात आले; मात्र या विरोधात अमेरिका आणि युरोपीय देश हे कोणतीही कारवाई करत नाहीत. भारताने रशिया-युक्रेन संघर्षात युक्रेनची बाजू घेतली नाही; म्हणून याच देशांनी रान उठवले होते.
३. जगासह भारताने वेळीच सावध होणे आवश्यक !
न्यूमोनियासारख्या एका रहस्यमय साथीच्या आजाराने चीनमध्ये थैमान घातले आहे. उत्तर चीनमधील सर्व रुग्णालयांमध्ये गंभीर परिस्थिती असून नेहमीच्या सवयीप्रमाणे चीन हे लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हाच प्रकार ३ वर्षांपूर्वी चीनने कोरोना महामारीविषयी केला. जगासह भारताने वेळीच सावध होणे आवश्यक आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक (१.१२.२०२३)
(डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या फेसबुक पानावरून साभार)