नारायणगाव (जिल्हा पुणे) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य शशिकांत मनोहर ठुसे यांचे २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी २ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले होते. रात्री १ वाजता त्यांचे पार्थिव ठाणे येथून नारायणगाव येथे आणण्यात आले. त्यांचा अंत्यविधी ३० नोव्हेंबरला सकाळी १० वाजता नारायणगाव येथे मीनानदी तीरावर हरिस्वामी मंदिराजवळ झाला. सकाळी ६ पासून प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांचे भक्त अंत्यदर्शनासाठी येत होते. मनोहरबाग ते मीनानदी तीरावर हरिस्वामी मंदिरापर्यंत अंत्ययात्रा होती. या वेळी नारायणगाव परिसरातील सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित होती. सनातनचे साधकही अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. दशक्रिया विधी ८ डिसेंबर २०२३ या दिवशी सकाळी ७ वाजता मीनानदी तीरावर होणार आहेत.
विशेष
‘शशिकांत ठुसे यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता. वातावरणातही चैतन्य जाणवत होते. उपस्थितांचा नामजप होत होता’, असे अंत्ययात्रेत सहभागी काही जणांनी सांगितले.