हिंगणघाट (जिल्हा वर्धा), ३० नोव्हेंबर (वार्ता.) – पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान, शहालंगडीचे (हिंगणघाट, जिल्हा वर्धा) महंत पू. वासुदेव महाराज (वय ७० वर्षे) यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता देहत्याग केला. पू. वासुदेव महाराज हे हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह गावचे होते. या देवस्थानचे तत्कालीन महंत नागाबाबा यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या अनुमतीने त्यांना शहालंगडी येथे वयाच्या ६ व्या वर्षी आणले होते. महंत नागाबाबा यांच्या निर्वाणानंतर पू. वासुदेव महाराज या मंदिराचे महंत झाले. पू. वासुदेव महाराज यांचे सनातन संस्थेच्या धर्मकार्याला नेहमीच आशीर्वाद लाभले.