हुपरी येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन हुपरी पोलीस ठाण्यात सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक) ‘हुपरी परिसरात जाणीवपूर्वक टिपू सुलतानचे स्टेटस’ ठेवण्याचे प्रकार होत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नितीन काकडे, मनसे उपशहरप्रमुख श्री. ऋषिकेश साळी, श्री. सागर चव्हाण, श्री. अविनाश बागल, ‘दुर्गवेध प्रतिष्ठान’चे श्री. महादेव आढावकर, श्री. नामदेव घायदार, श्री. धनंजय धायगुडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रोहित माळी, श्री. अमित बागल, श्री. शुभम पाटील उपस्थित होते. सांगली शहर पोलीस ठाण्यातही याच मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.