मुंबई – महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आय्.टी.आय्.) अभ्यासक्रमात महापुरुषांच्या कौशल्याचा आणि संबंधित विचारांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. हा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी संचालनालयाच्या स्तरावरून स्थापन करण्यात आलेल्या समितीला ८ नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.
महापुरुषांनी त्यांच्या काळात सामाजिक कौशल्यांचा अंगीकार करून सामाजिक जीवनामध्येही ती विकसित केली. महापुरुषांची कौशल्ये आणि धोरण यांचा लाभ युवकांना व्हावा, यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमात ५ महापुरुषांच्या कार्यकौशल्याचा समावेश करण्यात आला आहे.