परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍यानुसार ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे अधिवक्‍ता रामदास केसरकर यांनी सौ. प्रमिला केसरकर यांच्‍यासाठी नामजपादी उपाय केल्‍यावर त्‍यांना वेदना सुसह्य होणे

आज, २७ ऑक्‍टोबर (आश्विन शुक्‍ल त्रयोदशी) या दिवशी सनातनच्‍या १२१ व्‍या संत पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांची द्वितीय पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांचे पती सनातन संस्‍थेचे विधीसंबंधी मानद सल्लागार अधिवक्‍ता रामदास केसरकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

पू. (कै.) सौ. प्रमिला केसरकर

पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांच्‍या द्वितीय पुण्‍यतिथीनिमित्त त्‍यांच्‍या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍याप्रमाणे सौ. केसरकर यांच्‍यासाठी नामजपादी उपाय करतांना त्‍यांनाही श्रीकृष्‍णाचा नामजप करायला सांगणे

‘माझी पत्नी सौ. प्रमिला (आताच्‍या पू. (कै.) प्रमिला रामदास केसरकर) कर्करोगाने आजारी होत्‍या. १८.९.२०२१ पासून गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितल्‍याप्रमाणे मी सौ. प्रमिला यांच्‍यासाठी नामजपादी उपाय करायला आरंभ केला. गुरुदेव मला म्‍हणाले होते, ‘‘हे उपाय करतांना सौ. केसरकर यांनाही श्रीकृष्‍णाचा नामजप करायला सांगा.’’ त्‍याप्रमाणे मी प्रमिला यांच्‍यासाठी नामजपादी उपाय करत असतांना त्‍यांना श्रीकृष्‍णाचा नामजप करायची आठवण करत असे. त्‍यामुळे त्‍या वेळी त्‍याही श्रीकृष्‍णाचा नामजप भावपूर्ण करत असत.

अधिवक्ता रामदास केसरकर

२. सौ. केसरकर यांच्‍यासाठी नामजपादी उपाय करत असतांना घामाघूम होऊन थकणे, सौ. केसरकर यांना थंडी वाजत असल्‍याने पंखा लावता न येणे आणि ‘गुरुदेव आपल्‍याकडून उपाय करून घेणार’, याची निश्‍चिती असल्‍याने नियमितपणे उपाय करणे

सौ. प्रमिला यांना थंडी वाजत असल्‍याने त्‍यांना नेहमी स्‍वेटर घालूनच रहावे लागत असे. त्‍यांना थंडी वाजत असल्‍यामुळे मला पंखा लावता येत नसे. त्‍यामुळे मला पुष्‍कळ गरम होत असे आणि त्‍यांच्‍यासाठी उपाय करतांना मी घामाघूम होऊन थकून जात असे, तरीही गुरुदेवांनी सांगितले आहे, म्‍हणजे ‘अशा परिस्‍थितीत ते माझ्‍याकडून सौ. प्रमिला यांच्‍यावर नामजपादी उपाय करून घेणार’, याची मला मनोमन निश्‍चिती असल्‍याने मी सौ. प्रमिला यांच्‍यावर नियमित उपाय करत होतो.

३. नामजपादी उपायांमुळे सौ. केसरकर यांना वेदना सुसह्य होणे

गुरुदेवांनी सांगितलेले नामजपादी उपाय चालू केल्‍यानंतर सौ. प्रमिला यांच्‍या हाता-पायांत होणार्‍या असह्य वेदनांची तीव्रता श्री गुरुकृपेने न्‍यून होऊन त्‍यांना वेदना सुसह्य होत असत. त्‍यामुळे ‘सौ. प्रमिला यांना या उपायांचा लाभ होत आहे’, असे मला जाणवले.’

(‘हे लिखाण सौ. प्रमिला केसरकर संत होण्‍याच्‍या पूर्वीचे असल्‍याने त्‍यांच्‍या नावाआधी ‘पू.’ लावलेले नाही.’ – संकलक)

– अधिवक्‍ता रामदास केसरकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, विधीसंबंधी मानद सल्लागार, सनातन संस्‍था), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१४.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक