पुणे – २ दिवसांपूर्वीच मद्यधुंद चालकामुळे एका व्यक्तीचा मृत्यू नारायण पेठेमध्ये झाला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेत मद्यपी वाहनचालकांवर दंडासह परवाना निलंबनाची कारवाई चालू केली आहे. मागील ९ मासांमध्ये अशा २९३ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
वाहतूक पोलिसांकडून नववर्ष स्वागत (३१ डिसेंबर), धुलीवंदनाच्या दुसर्या दिवशी मद्यपान करून वाहने चालवणार्यांवर कारवाई केली जाते; परंतु त्यानंतर कठोर कारवाई होत नाही. पुणे शहरामध्ये १ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या काळात एकूण ९०१ अपघात झाले. त्यामध्ये २६९ मृत्यूमुखी पडले, तर ५१९ जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.
संपादकीय भूमिकामद्य पिऊन वाहन चालवणार्यांमुळे होणार्या हानीचा विचार करता सर्वत्र मद्यबंदीच का हवी ? हे लक्षात येते ! |