पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित होत आहे !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

मॉस्को (रशिया) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय बुद्धीमान व्यक्ती आहेत. त्यांच्याशी आमचे चांगले राजकीय संबंध आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित होत आहे. हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे. आर्थिक संरक्षणाशी संबंधित एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन यांनी हे वक्तव्य केले. या वेळी त्यांनी ‘रशिया आणि भारत आर्थिक संरक्षण अन् सायबर गुन्हेगारी या क्षेत्रांत एकत्र काम करतील’, अशी आशाही व्यक्त केली. भारत आणि रशिया हे शतकानुशतके मित्र आणि भागीदार आहेत. दोन्ही देशांनी ठरवलेला कार्यसूची (अजेंडा) आम्ही निश्‍चितपणे साध्य करू, असेही पुतिन या वेळी म्हणाले.

साधारण मासाभरापूर्वी देहलीत झालेल्या जी-२० च्या शिखर परिषदेत भारताने रशिया-युक्रेन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याविषयी वक्तव्य केले होते; परंतु रशियावर कोणताही आरोप केला नव्हता. मॉस्कोने या घोषणेचे आणि भारताच्या जी-२०च्या अध्यक्षपदाचे समर्थन केले होते.

संपादकीय भूमिका

व्लादिमिर पुतिन यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे वारंवार होणारे कौतुक पाहून जर ‘पुतिन भाजपचे आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते आहेत’, असे वक्तव्य एखाद्या उपटसुंभ काँग्रेसी नेत्याने केले, तरी आश्‍चर्य वाटू नये !