‘समष्टी साधना म्हणजे समाजाची साधना आणि व्यष्टी साधना म्हणजे व्यक्तीची साधना. पूर्वी कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के आणि व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व होते; पण आता काळानुसार समष्टी साधना ६५ टक्के आणि व्यष्टी साधना ३५ टक्के महत्त्वाची आहे.
सध्या समष्टी साधना करतांना साधकांवर ६ व्या आणि ७ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींची सूक्ष्मातून आक्रमणे होत आहेत. साधकांची व्यष्टी साधना, म्हणजे ‘नामजप करणे, आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे’ इत्यादी अल्प पडत असल्याने साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील वाईट शक्तींचे त्रास वाढले आहेत. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे प्रयत्न अल्प पडल्याने वाईट शक्ती साधकांच्या मनातील निरर्थक अन् नकारात्मक विचारांत वाढ करून त्यांच्या साधनेत आणि सेवेत विघ्ने आणत आहेत. त्यामुळे साधकांनी व्यष्टी साधना वाढवून स्वतःभोवती साधनेचे संरक्षककवच निर्माण करणे आवश्यक आहे. व्यष्टी साधना वाढल्यावर साधकांचे आध्यात्मिक बळ वाढेल आणि त्यामुळे त्यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होऊन त्यांची साधना अन् सेवा चांगली होण्यास साहाय्य होईल.’
– (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. आठवले (२८.७.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |