मुंबई – अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरला येथील स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असणार्या एका महिलेने पाकिस्तानी आतंकवाद्यांविषयी खोटी माहिती देणारा दूरभाष मुंबई पोलिसांना केला. यामुळे सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या; परंतु नंतर तिने खोटी माहिती दिल्याचे अन्वेषणातून उघड झाले. या महिलेने वर्ष २०२२ पासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ११० वेळा दूरभाष केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही महिला स्किझोफ्रेनिया आजारासाठी घाटकोपर येथील आधुनिक वैद्यांकडे उपचार घेत आहे. या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.
स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ?
स्किझोफ्रेनिया हा गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार असून त्यामुळे भास, भ्रम, गोंधळलेली विचारपद्धत आणि वर्तन असे परिणाम जाणवतात. अशा अवस्थेत व्यक्तीला भास झाल्यामुळे ती तेच सत्य मानून कृती करते. |