महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या अन्वेषणासाठी मुंबईत स्वतंत्र श्‍वानपथक येणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – मुंबईत शहरातील निर्भया पथकामध्ये (महिला सुरक्षितता पुढाकार योजना) श्‍वानपथक (डॉग स्कॉड) कार्यरत होणार आहे. यासाठी गृहविभागाने १० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे. मुंबई शहरातील निर्भया योजनेसाठी वर्ष २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाकडून २५२ कोटी रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. केंद्रशासनाकडून ६० टक्के आणि महाराष्ट्र शासनाकडून ४० टक्के अशा प्रकारे हा निधी प्राप्त झाला आहे. सध्या निर्भया पथकासाठी मुंबईमध्ये स्वतंत्र गाड्या आहेत. श्‍वानपथकामुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या अन्वेषणाला गती मिळेल.