देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणारे सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यातील विविध गुणवैशिष्ट्ये त्यांची मुलगी कु. वैदेही शिंदे यांनी येथे दिली आहेत.
१. जवळीक साधणे
१ अ. साधना न करणार्या व्यक्तीलाही सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या स्वभावातील वैशिष्ट्य लक्षात येणे : ‘सद़्गुरु बाबांकडे (सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडे) इतरांना आपलेसे करण्याची कला आहे. ते नवीन साधकालाही प्रथम भेटीतच आपलेसे करतात. सद़्गुरु बाबांमधील प्रीतीमुळे साधक त्यांच्याकडे आकर्षिले जातात. एकदा मी एका साधिकेच्या घरी गेले होते. तिच्या कुटुंबातील काही सदस्य साधना करतात, तर काही सदस्य साधना करत नाहीत. सद़्गुरु बाबा घरातील सर्व व्यक्तींशी भ्रमणभाषवर बोलले. त्यानंतर घरातील साधना न करणार्या एका व्यक्तीने सांगितले, ‘‘सद़्गुरु राजेंद्रदादा पुष्कळ छान आहेत. त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्य लक्षात येते. त्यांच्याशी बोलल्यानंतर चांगले वाटले आणि घरातील वातावरणातही पालट जाणवला.’’ ‘सद़्गुरु बाबांमधील ‘इतरांना आपलेसे करण्याची कला आणि त्यांच्या वाणीतील चैतन्याचा प्रभाव’ बाहेरच्या व्यक्तीलाही जाणवतोे’, असे माझ्या लक्षात आले.
१ आ. अनेक वर्षांपूर्वी सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांना भेटलेली व्यक्ती आजही त्यांची आठवण काढत असणे : वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवानिमित्त पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे संत, वय ६३ वर्षे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘सद़्गुरु राजेंद्रदादा काही वर्षांपूर्वी धनबाद येथे प्रचारसेवेनिमित्त आले होते. तेव्हा त्यांनी तेथील एका केशकर्तन करणार्या व्यक्तीकडे केस कापले होते. आता एवढी वर्षे झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती सद़्गुरु दादांची आठवण काढते. त्या व्यक्तीने सांगितले, ‘‘ते जे दादा आले होते, ते पुष्कळ चांगले होते.’’ तेव्हा सद़्गुरु दादांमधील ‘बाहेरच्या व्यक्तीलाही प्रेमाने आपलेसे करण्याचे कौशल्य आणि प्रीती’ या गुणांचे महत्त्व माझ्या मनावर कोरले गेले.
१ इ. साधक सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांना अनेक वर्षांनंतर भेटत असूनही त्यांना सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याविषयी आपुलकी असणे : आम्ही मागच्या वर्षी चेन्नई येथे गेलो होतो. तेव्हा आमची तेथील साधकांशी भेट झाली. चेन्नई येथे पुष्कळ वर्षांनी सद़्गुरु बाबा आले; म्हणून साधकांनी सद़्गुरु बाबांना मार्गदर्शन करायला सांगितले. तेव्हा ‘साधकांना सद़्गुरु बाबांविषयी पुष्कळच जिव्हाळा आणि प्रेम आहे’, असे लक्षात आले. साधक आम्हाला आत्मीयतेने सांगत होते, ‘‘सद़्गुरु दादांमुळेच आम्ही साधनेत आलो. त्यांच्यामुळेच ‘आम्हाला सेवा कशी करायची ?’, समजले. ‘४ – ५ साधक असतांनाही हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे परिपूर्ण नियोजन कसे करायचे ?’, याविषयी आम्हाला सद़्गुरु दादांमुळे शिकायला मिळाले.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘सद़्गुरु बाबा पुष्कळ वर्षांपासून प्रचारसेवेत नाहीत, तरीही साधकांना त्यांच्याविषयी आपुलकी वाटते. आपल्यातील ‘प्रीती’ या गुणामुळे आपण हा अनुभव घेऊ शकतो. ‘इतरांवर निरपेक्ष प्रेम करणे’ हा साधनेतील सर्वांत महत्त्वाचा गुण आहे.’ त्या वेळी परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) ‘कार्यापेक्षा साधक महत्त्वाचा आहे’, या उद़्गारांची मला प्रचीती आली.
१ ई. सद़्गुरु बाबांना भारतभरातून अनेक साधक त्यांच्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण खाऊ पाठवतात. याचे मला फार अप्रूप वाटते.
१ उ. साधकांना खाऊ देणे : सद़्गुरु बाबा त्यांना मिळालेला खाऊ नेहमी इतरांना देतात. एखाद्या साधकाला त्रास होत असल्यास सद़्गुरु बाबा त्याला खाऊ (प्रसाद) पाठवतात. ‘काही वेळा एखाद्या साधकाला सद़्गुरु बाबांची आठवण येत असते; मात्र सद़्गुरु बाबांना याविषयी ठाऊक नसते. सद़्गुरु बाबा त्या साधकाला खाऊ पाठवतात. तेव्हा त्या साधकाला आनंद होतो’, असेही घडते. सद़्गुरु बाबा मला जो खाऊ आवडतो, तो आठवणीने मला पाठवतात.
१ ऊ. बालसाधक सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याशी प्रेमाने बोलत असणे : सद़्गुरु बाबा आश्रमात महाप्रसाद ग्रहण करतांना बालसाधक सद़्गुरु बाबांना भेटायला येतात. बालसाधक मोकळेपणाने सद़्गुरु बाबांशी बोलतात. बालसाधकांनी एखादी नवीन वस्तू बनवल्यास ते सद़्गुरु बाबांना दाखवतात.
१ ए. सर्व वयोगटांतील साधकांशी जवळीक साधणारे सद़्गुरु राजेंद्र शिंदे : सद़्गुरु बाबांची सर्व वयोगटांतील साधकांशी जवळीक आहे. सद़्गुरु बाबा देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील अनेक साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा (टीप) घेतात. सद़्गुरु बाबांची त्या सर्व साधकांशी जवळीक असल्याने साधक मोकळेपणाने मनातील विचार किंवा प्रसंग सद़्गुरु बाबांना सांगतात. (टीप : साधक करत असलेला नामजप, प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न, कृतज्ञता, तसेच स्वभावदोष अन् अहं यांची निर्मूलन प्रक्रिया, या सूत्रांविषयी जाणून घेणे आणि साधकांना त्या संदर्भात दिशा देणे)
२. तत्परता
सद़्गुरु बाबांना वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण कल्पना सतत सुचत असतात. ते सतत उत्साही असतात. त्यांची प्रकृती गतीने कृती करण्याची आहे. त्यांच्यात ‘तत्परता’ हा गुण अधिक प्रमाणात आहे.
३. शिष्याचे गुण अंगी बाणवलेले सद़्गुरु राजेंद्र शिंदे !
सद़्गुरु बाबा मला सतत सांगतात, ‘‘प.पू. डॉक्टरांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे आज्ञापालन करायचे.’’ याविषयी सद़्गुरु बाबांच्या प्रत्येक कृतीतून मला अनुभवता येते. ‘खरे शिष्यत्व कसे असते !’, हे सद़्गुरु बाबांमुळे माझ्या लक्षात येते’, त्याबद्दल मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
४. तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही तळमळीने साधना करून सद़्गुरुपद गाठणे
सद़्गुरु बाबा दिवसभरातील बराच वेळ समष्टीसाठी नामजप करतात. त्यामुळे त्यांच्यावर वाईट शक्तींची आक्रमणे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यांची प्राणशक्ती काही वेळा न्यून होते, तरीही ते दिवसभरातील नामजप पूर्ण करूनच झोपतात. त्यांना असलेल्या तळमळीमुळेच त्यांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे. सद़्गुरु बाबांची समष्टी सेवा करण्याची प्रकृती (पिंड) आहे; मात्र त्यांना होत असलेल्या शारीरिक त्रासांमुळे त्यांना अनेक वर्षे प्रचारसेवा करणे शक्य नव्हते. त्यांना सतत पलंगावर पडून रहावे लागत असे. अशा स्थितीतही त्यांनी सद़्गुरुपद गाठले. ‘रुग्णाईत असतांनाही आध्यात्मिक उन्नती कशी होऊ शकते !’,
याचा आदर्श त्यांनी साधकांसमोर ठेवला आहे. ‘तळमळ असेल, तर कोणत्याही परिस्थितीत प्रगती होऊ शकते’, हे त्यांनी तळमळीने केलेल्या साधनेतून लक्षात येते.
५. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चेहर्यामध्ये जाणवत असलेले पालट
मला सद़्गुरु बाबांच्या चेहर्यामध्ये प्रतिवर्षी पालट जाणवतो. मला त्यांच्या चेहर्यावर काही वेळा गुलाबी (प्रीतीची) छटा दिसते, तर काही वेळा लालसर छटा (मारक रूप) दिसते. काही वेळा त्यांच्यावर सूक्ष्मातून वाईट शक्तींची आक्रमणे होतात. तेव्हा ‘त्यांच्या चेहर्यावर काळसर छटा येते’, असे मला जाणवते. मला त्यांच्या चेहर्यावर काही वेळा चकाकी जाणवते आणि त्यांचा चेहरा शुभ्र पांढरा दिसतो.
‘सद़्गुरु बाबा आणि साधक यांच्यातील अतूट नाते मला अनुभवता आले आणि शिकता आले’, याबद्दल मी गुरुमाऊली अन् सद़्गुरु बाबा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. वैदेही राजेंद्र शिंदे (सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांची कन्या), फोंडा, गोवा. (१४.९.२०२३)
सद़्गुरु राजेंद्र शिंदे चेन्नई येथे वास्तव्यास असतांना तेथील साधकांना आलेल्या अनुभूती !सद़्गुरु राजेंद्र शिंदे २०.३.२०२२ ते २४.३.२०२२ या कालावधीत तमिळनाडूतील चेन्नई येथे गेले होते. त्या वेळी तेथील साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. १. पू. (सौ.) उमा रवीचंद्रन्, चेन्नईअ. ‘सद़्गुरु राजेंद्रदादा यांनी ‘प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळे दूर करण्यासाठी नामजप कसा शोधायचा ? पंचतत्त्व आणि निर्गुण यांचे उपाय कसे करायचे ?’, हे शिकवले. मी अमेरिकेहून परत आल्यापासून माझ्या छातीवर दाब जाणवत होता. सद़्गुरु दादांनी मला अनाहतचक्राच्या ठिकाणी नामजपादी उपाय करायला सांगितले. मी तसे केल्यावर दोनच दिवसांत मला पुष्कळ चांगले वाटू लागले. माझ्या छातीवरील मोठे ओझे काढून टाकल्याप्रमाणे जाणवत होतेे. आ. सद़्गुरु राजेंद्रदादा यांच्या वास्तव्याच्या संपूर्ण कालावधीत, विशेषकरून ते साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांची साधकांवर असलेली प्रीती अनुभवता येत होती.’ २. श्री. आर्. जयकुमार, चेन्नईअ. ‘सद़्गुरु राजेंद्रदादा (सद़्गुरु राजेंद्र शिंदे) यांनी सत्संगात ‘आध्यात्मिक उपाय कसे करावेत ?’, हे समजावून सांगितलेे. त्यानंतर ‘आध्यात्मिक उपाय करणे किती महत्त्वाचे आहे’, ते माझ्या मनावर बिंबले. आता मी ते उपाय नियमितपणे करण्याचा निश्चय केला आहे.’ ३. सौ. सुगंधी जयकुमार, चेन्नई (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)अ. ‘सद़्गुरु राजेंद्रदादांच्या सत्संगात असतांना माझ्या शरिरात विद्युत्प्रवाह गेल्याप्रमाणे जाणवले. त्यामुळे ‘माझ्यावर आध्यात्मिक उपाय झाले’, असे जाणवले. त्यानंतर माझे मन अंतर्मुख झाले आणि स्वतःतील ‘अधिकारवाणीने बोलणे’, यांसारख्या तीव्र स्वभावदोषांची मला जाणीव झाली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच सद़्गुरु राजेंद्रदादांना आमच्यासाठी नामजपादी उपाय करण्यासाठी पाठवले’, असे मला जाणवले. आ. भोजन करतांना मी सद़्गुरु राजेंद्रदादा यांच्या समोर बसले होते. आम्हाला दिलेल्या ताकावर ‘ॐ’ उमटला होता. तेव्हा ‘अन्नाच्या माध्यमातूनही चैतन्य मिळत आहे’, असे जाणवले. इ. २४.३.२०२२ या दिवशी सद़्गुरु राजेंद्रदादा चेन्नईहून निघणार होते. त्या दिवशी आमच्या घरी श्राद्धविधी होता. त्यासाठीची सर्व सिद्धता व्यवस्थित होत असली, तरी त्या वेळी माझ्यातील ‘कर्तेपणा’ जागृत होत होता; मात्र सद़्गुरु राजेंद्रदादांच्या मार्गदर्शनामुळे मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करू शकत होते. विधीनंतर सर्व आवराआवर करतांना माझ्याकडून कुंकू सांडले. त्या सांडलेल्या कुंकुवाचा आकारही ‘ॐ’ प्रमाणे दिसत होता.’ (सर्व सूत्रांचा दिनांक २६.३.२०२२) |
|