२१.९.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठ ६ वर ‘देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद़्गुरु राजेंद्र शिंदे निवास करत असलेल्या खोलीत गेल्यावर आश्रमातील संतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती’, या मथळ्याखालील लेखात ‘सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी खोलीच्या संदर्भात मला हरवले’ याविषयी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचे अभिनंदन करणारी चौकट वाचली. तेव्हा मला ‘शिष्यात् इच्छेत् पराजयम् !’ म्हणजे ‘शिष्याकडून पराजयाची इच्छा करावी.’ हे वचन आठवले.
‘आपण दिलेल्या शास्त्रज्ञानात शिष्याने असे पारंगत व्हावे की, त्या शास्त्रज्ञानात त्याने आपलाच पराभव (शिकवण्यात यशस्वी ठरल्यामुळे) करावा’, अशी इच्छा बाळगणारे ते खरे गुरु !’, हेच तत्त्व ‘शिष्यात् इच्छेत् पराजयम् !’ या वचनात अगदी थोडक्यात सांगितले आहे. खर्या गुरूंसमोरचे ध्येय म्हणजे ‘शिष्यात् इच्छेत् पराजयम् !’; पण हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा शिष्यही शिकण्यासाठी त्या योग्यतेचा असेल तरच !’
परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मातील प्रत्येक तत्त्व आचरणात आणत आहेत. धन्य ते सनातनचे संत आणि सद़्गुरु अन् त्यांना घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !
‘परम पूज्य, आपल्याच कृपेने सुचलेली ही शब्दसुमने आपल्या चरणी अर्पण करते आणि ‘आपणच माझ्याकडून आपल्याला अपेक्षित अशी साधना प्रत्येक क्षणी करून घ्यावी’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– सौ. अंजली काणे, फोंडा, गोवा. (२२.९.२०२३)