आरंभीपासून अग्‍निहोत्राची साधना करणार्‍या आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी अपार भाव असलेल्‍या म्‍हापसा (गोवा) येथील सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी (वय ८६ वर्षे) !

सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी यांचा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी असलेला भाव !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यासमवेत सद़्‍गुरु आपटेआजींच्या घरी गेलेल्‍या साधकांना जाणवलेली सूत्रे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जीवनदर्शन ग्रंथ हातात धरलेल्या सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी

१ अ. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य आणि आध्‍यात्मिक संशोधन’ हा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जीवनदर्शन ग्रंथ भेट मिळाल्‍यावर सद़्‍गुरु आपटेआजींनी तो हृदयाशी धरणे आणि त्‍या ग्रंथासह स्‍वतःचे छायाचित्र काढून घेणे : ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी सौ. प्रणिता आपटे यांची आध्‍यात्मिक पातळी वाढून ती ६५ टक्‍के झाल्‍याचे सांगितल्‍यावर आश्रमातून आणलेला प्रसाद आणि गुरुदेवांनी प्रसादस्‍वरूपात दिलेल्‍या भेटवस्‍तू सर्वांना दिल्‍या. त्‍या प्रसंगाची छायाचित्रे काढत असतांना सद़्‍गुरु आपटेआजी यांनी स्‍वतःहून सौ. प्रणिताकाकूंकडून ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य आणि आध्‍यात्मिक संशोधन’ हा गुरुदेवांचा जीवनदर्शन ग्रंथ मागून घेतला. त्‍यांनी तो ग्रंथ त्‍यांच्‍या हृदयाशी धरला. ग्रंथावरील परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या छायाचित्रावरून हात फिरवत असतांना ‘तिथे प्रत्‍यक्ष परम पूज्‍य आहेत’, असा त्‍यांचा भाव होता. त्‍या एखाद्या लहान बालकाप्रमाणे ग्रंथावरील छायाचित्रे न्‍याहाळत होत्‍या. ‘या अनमोल क्षणाचे छायाचित्र मिळावे’, यासाठी त्‍यांनी स्‍वतःहून ‘ग्रंथाचा समोरचा भाग छायाचित्रात दिसेल’, असा धरला. (समवेत छायाचित्र आहे.) यापूर्वी त्‍यांनी कधीही स्‍वतःचे छायाचित्र काढून घेतले नाही. या वेळी त्‍यांनी पहिल्‍यांदाच ग्रंथासह स्‍वतःचे छायाचित्र काढून घेतले.

१ आ. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाच घरी घेऊन या, म्‍हणजे सगळे मिळाल्‍यासारखे आहे’, असे सांगणार्‍या सद़्‍गुरु आपटेआजी ! : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आपटे कुटुंबियांंना भेटायला जातांना आपटे कुटुंबियांसाठी प्रसाद आणि भेटवस्‍तू घेऊन गेल्‍या होत्‍या. ते पाहून सद़्‍गुरु आपटेआजी त्‍यांना म्‍हणाल्‍या, ‘‘हे सर्व कशाला आणलेत ? गुरुदेवांना हा त्रास कशाला ? पुढच्‍या वेळी काहीच आणू नका, केवळ गुरुदेवांना घेऊन या. ते आले म्‍हणजे सगळे आले.’’ त्‍यांच्‍या या बोलण्‍यातून त्‍यांचा श्री गुरूंविषयी असलेला उच्‍च भाव लक्षात येतो.’

– कु. वैष्‍णवी वेसणेकर (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सौ. वर्धिनी गोरल (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) आणि श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(४.९.२०२३)


सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी यांची म्‍हापसा येथील सनातनचे साधक आणि रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमातील साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी

१. सौ. शर्वाणी आगरवाडेकर, म्‍हापसा, गोवा

१ अ. प्रेमभाव : ‘सद़्‍गुरु आपटेआजींच्या घरी कुणीही गेले, तरी त्‍यांना खाऊ दिल्‍याविना त्‍या कधीच सोडत नाहीत.

१ आ. देवावरील भक्‍ती

१. सद़्‍गुरु आपटेआजी अजूनही प्रत्‍येक सोमवारी उपवास करतात. एवढे वय (८६ वर्षे) होऊनही आणि बरे वाटत नसतांनाही त्‍या उपवास करण्‍याचे सोडत नाहीत.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये परशुरामाचे चित्र शेवटच्‍या पानावर छापले जाते. ते पाहून त्‍या म्‍हणतात, ‘‘गोवा ही परशुरामाची भूमी आहे; म्‍हणून त्‍याचे चित्र पहिल्‍या पानावर हवे.’’ एवढे त्‍यांचे देवावर प्रेम आहे.

१ इ. सद़्‍गुरु आपटेआजींचा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी असलेला भाव !

१ इ १. सनातन संस्‍थेचा कुणीही साधक घरी आल्‍यावर आनंद होणे : सनातन संस्‍थेचा कुठलाही साधक सद़्‍गुरु आपटेआजींच्‍या घरी गेला, तरी त्‍यांना पुष्‍कळ आनंद होतो. त्‍या सर्व साधकांना ओळखत नाहीत; पण त्‍यांच्‍या मनात गुरुदेवांविषयी असलेल्‍या अपार भावामुळे ‘केवळ तो गुरुदेवांचा साधक आहे’; म्‍हणून त्‍यांना पुष्‍कळ आनंद होतो.

१ इ २. ‘साधकांच्‍या गाड्याही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍याच आहेत’, असा भाव असणे : साधकांच्‍या गाड्या गुरुदेवांच्‍याच आहेत’, असा त्‍यांचा भाव असतो. साधक आजींना कधी आश्रमात किंवा अन्‍य कुठे घेऊन जातात, तेव्‍हा त्‍या म्‍हणतात, ‘‘गुरुदेवांनी मला पुष्‍कळ गाड्या दिल्‍या आहेत.’’

१ इ ३. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा फारसा सत्‍संग न लाभताही त्‍यांच्‍याविषयी आंतरिक भक्‍तीभाव असणे : आम्‍हा साधकांना भक्‍तीसत्‍संग, मार्गदर्शन किंवा अनेक सत्‍संग सोहळे बघायला मिळाले आहेत. त्‍या तुलनेत सद़्‍गुरु आपटेआजींनी हे सर्व ऐकलेले किंवा पाहिलेले नाही. तरीही त्‍यांच्‍या मनात गुरुदेवांविषयी पुष्‍कळ भक्‍ती आहे. त्‍या नेहमी म्‍हणतात, ‘‘भक्‍ताला देवाची काळजी आणि देवाला भक्‍ताची काळजी !’’

१ इ ४. सद़्‍गुरु आपटेआजींना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची पाद्यपूजा करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचेच चरण दिसणे : एकदा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ सद़्‍गुरु आपटेआजींच्‍या घरी आल्‍या होत्‍या. तेव्‍हा सद़्‍गुरु आपटेआजींना ‘प.पू. गुरुदेवही घरी यायला पाहिजे होते’, असे वाटले. गुरुदेवांच्‍या आठवणीने त्‍यांचा कंठ दाटून आला. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांची पाद्यपूजा करतांना त्‍यांना गुरुदेवांचेच चरण दिसत होते. एवढी त्‍यांची गुरुदेवांवर भक्‍ती आहे.’

२. सौ. शीला मांद्रेकर, म्‍हापसा, गोवा.

२ अ. सद़्‍गुरु आपटेआजींनी त्‍यांची रामनाथी आश्रमात काढलेली छायाचित्रे पुष्‍कळ आनंदाने दाखवणे : एकदा मी सद़्‍गुरु आपटेआजींच्‍या सेवेसाठी त्‍यांच्‍या घरी गेले होते. तेव्‍हा त्‍यांनी मला मोठ्या आनंदाने रामनाथी आश्रमात काढलेल्‍या त्‍यांच्‍या छायाचित्रांचा ‘अल्‍बम’ पहाण्‍यास दिला. त्‍यामध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची छायाचित्रे पहातांना माझी पुष्‍कळ भावजागृती झाली.

२ आ. सद़्‍गुरु आपटेआजींची सेवा करतांना आनंद मिळणे : ‘सद़्‍गुरु आपटेआजींची सेवा करतांना मला पुष्‍कळ आनंद मिळाला. त्‍यांनी मला प्रेमाने सांगितले, ‘‘२ घंटे नामजप करा.’’

२ इ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावरील श्रद्धा : एकदा सद़्‍गुरु आपटेआजींच्‍या घरासमोर एक छोटासा साप आला होता. मी ते त्‍यांना सांगितल्‍यावर त्‍यांनी लगेच नामजप चालू केला, तसा तो साप शांतपणे निघून गेला. नंतर सद़्‍गुरु आपटेआजी मला म्‍हणाल्‍या, ‘‘असे पुष्‍कळ साप येतात; पण परम पूज्‍य आहेत ना !’’

२ ई. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी असलेला भाव : सद़्‍गुरु आपटेआजींनी मला आनंदाने सांगितले, ‘‘आता अधिक मास आहे. मला परम पूज्‍यांसाठी काहीतरी करून न्‍यायला पाहिजे.’’

३. सौ. अंजली नायक, म्‍हापसा, गोवा.

३ अ. प्रीती : सद़्‍गुरु आपटेआजींना भेटल्‍यावर त्‍यांच्‍या स्‍पर्शातून प्रीती आणि ममत्‍व यांचा वर्षाव होत असतो. पुष्‍कळ दिवसांनी त्‍यांच्‍याकडे गेल्‍यावर त्‍या मायेने विचारतात, ‘‘इतके दिवस कुठे होतीस ?’’

३ आ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती असलेला भाव ! : गुरुमाऊलींच्‍या प्रती त्‍यांचा शब्‍दातीत भाव आहे. त्‍यांच्‍या घरात काही विशेष पदार्थ केला, तर ‘तो परम पूज्‍यांना पाठवला पाहिजे’, अशी त्‍यांची तळमळ असते.

‘गुरुमाऊलींच्‍या कृपेनेच आम्‍हा म्‍हापसावासियांना अशी गुरुमाई (सद़्‍गुरु आपटेआजी) भेटली आहे’, यासाठी कोटीशः कृतज्ञता.

४. श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४ अ. सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी यांचा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍याप्रती असलेला भाव ! : ‘ऑगस्‍ट मासात सद़्‍गुरु आपटेआजी त्‍यांची सून सौ. प्रणिता यांची गुरुदेवांशी भेट झाल्‍यानंतर सद़्‍गुरु आपटेआजींनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना भेटण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. तेव्‍हा आश्रमात नव्‍हत्‍या; म्‍हणून मी सद़्‍गुरु आपटेआजींना म्‍हणालो, ‘‘त्‍यांना भेटता येणार नाही’’; पण सद़्‍गुरु आपटेआजींना त्‍यांना भेटण्‍याची तीव्र तळमळ होती. त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘‘मी त्‍यांना लांबूनच पाहून जाते; पण मला त्‍यांना भेटायचे आहे.’’

५. कु. कल्‍याणी गांगण (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५ अ. साधी आणि धार्मिक रहाणी : ‘सद़्‍गुरु आपटेआजी यांचे रहाणीमान अगदी साधे आहे; परंतु त्‍यांना पाहिल्‍यावर आनंद होऊन शांती मिळते. त्‍या साधनेसंदर्भात सोप्‍या भाषेत बोलतात. ‘त्‍यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. त्‍यांनी लहानपणापासून धर्माचे काटेकोरपणे पालन केले आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात धर्मतेज आहे.

५ आ. सद़्‍गुरु आपटेआजी यांनी अग्‍निहोत्राची साधना करून स्‍वतःला घडवणे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्‍यापासून त्‍यांना गुरु मानणे : सद़्‍गुरु आपटेआजी अग्‍निहोत्राची साधना करतात. त्‍यांनी तसे जीवन जगून स्‍वतःला घडवले आहे. अग्‍निहोत्राच्‍या साधनेशी त्‍या एकरूप झाल्‍या आहेत. या कलियुगात असे संत पहायला मिळणेही दुर्मिळ आहे. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी त्‍यांना शोधून काढले आहे. सद़्‍गुरु आपटेआजींची परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी पहिली भेट झाली, तेव्‍हापासून त्‍यांनी गुरुदेवांना गुरु मानले आहे.

५ इ. सद़्‍गुरु आपटेआजी नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतात आणि लेख लिहिलेल्‍या साधकांचे कौतुक करतात : त्‍या नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतात. त्‍यांना ‘समाजात वाढलेले रम-तम नष्‍ट व्‍हायला हवे’, असे वाटते. यातून त्‍यांचे मारक रूप दिसते.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी यांची सांगितलेली गुणवैशिष्‍ट्ये !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी यांच्‍या घरात आणि घराजवळच्‍या वातावरणात पुष्‍कळ चैतन्‍य जाणवणे

‘सद़्‍गुरु आपटेआजींच्या चैतन्‍यदायी अस्‍तित्‍वामुळे येथील वातावरणातही पुष्‍कळ चैतन्‍य आहे. येथील आसपासच्‍या लोकांना सद़्‍गुरु आपटेआजींचे माहात्‍म्‍य ठाऊक नसेल; परंतु त्‍यांनाही सद़्‍गुरु आपटेआजींमधील चैतन्‍याचा पुष्‍कळ लाभ होत आहे.

२. प्रीती

सद़्‍गुरु आपटेआजींची सर्वांवर पुष्‍कळ प्रीती आहे. त्‍यांच्‍यातील प्रीतीमुळे त्‍यांना भेटणारी प्रत्‍येक व्‍यक्‍ती त्‍यांच्‍याकडे आकर्षित होते आणि त्‍यांना भेटल्‍यानंतर त्‍या व्‍यक्‍तीला त्‍यांच्‍या घरातून जावेसे वाटत नाही.

३. अखंड अनुसंधानात राहून श्री गुरूंशी आंतरिक एकरूपता साध्‍य केलेल्‍या सद़्‍गुरु आपटेआजी !

सद़्‍गुरु आपटेआजींची गुरुदेवांवरील भक्‍ती अवर्णनीय आहे. तिचे आपण शब्‍दांत वर्णन करू शकत नाही. श्रीकृष्‍णाचा विरह राधा आणि गोपी यांना सहन होत नसे, त्‍याप्रमाणे सद़्‍गुरु आपटेआजींना श्री गुरूंचा विरह सहन होत नाही. त्‍यांची आंतरिक साधना आणि गुरुदेवांप्रती असलेली उत्‍कट भक्‍ती, यांमुळे त्‍या कलियुगातील भगवंतस्‍वरूप असलेल्‍या श्री गुरूंपासून विभक्‍त नाहीत. ‘श्री गुरूंशी असलेल्‍या अखंड अनुसंधानामुळे त्‍यांनी श्री गुरूंशी आंतरिक एकरूपता साध्‍य केली आहे’, असे मला वाटते.’

– (श्रीसत्‌शक्‍ति) सौ. बिंदा सिंगबाळ (४.९.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.