कोल्‍हापुरात पंचगंगा घाटावर ‘बॅरिकेट्‌स’ लावून भाविकांना कृत्रिम कुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍याची प्रशासनाची बळजोरी !

कोल्‍हापूर – गेल्‍या ३ वर्षांप्रमाणेच यंदाही कोल्‍हापूर महापालिका प्रशासनाने ‘बॅरिकेट्‌स’लावून पंचगंगा नदीचा घाट बंद करून भाविकांना कृत्रिम कुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यास भाग पाडले. त्‍याचसमवेत पंचगंगा नदी आणि शहरात मोठ्या प्रमाणात विसर्जन कुंड ठेवण्‍यात आले होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही काळी खाण येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्‍त्राचा कोणताही आधार नसणार्‍या ‘यांत्रिक पद्धतीची’(कन्‍व्‍हेअर बेल्‍ट) व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे.

महाराष्‍ट्रातील अन्‍य कोणत्‍याही जिल्‍ह्यात अशा प्रकारे नदीचा घाट ‘बॅरिकेट्‌स’ लावून बंद केला जात नाही; मात्र कोल्‍हापूर शहरात हा प्रकार गेल्‍या ३ वर्षांपासून चालू आहे. (श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रशासन भक्‍तांना सक्‍ती करू शकत नाही; मात्र ‘न्‍यायालयाचा आदेश आहे’, असे कारण पुढे करत श्री गणेशमूर्ती कुंडातच विसर्जन करण्‍यास भाग पाडत आहे ! – संपादक) शहरात मूर्तीदान घेण्‍यात काही सामाजिक संस्‍थाही पुढाकार घेतात; मात्र या संस्‍था वर्षभर नदीमध्‍ये होणारे प्रदूषण आणि भोंगे यांकडे सोयीस्‍कररित्‍या दुर्लक्ष करतात.

प्रशासनाच्‍या बळजोरीला न जुमानता भाविकांनी पंचगंगा नदीत विसर्जन केले ! या प्रसंगी विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्‍थित होते.