पाकमध्ये वर्ष २०२३ मध्ये अहमदिया समुदायाच्या २८ धार्मिक स्थळांवर आक्रमण !

प्रतिकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद – वर्ष २०२३ मध्ये देशातील विविध ठिकाणी पाकमधील अहमदिया समुदायाच्या २३ धार्मिक स्थळांवर कट्टरतावादी इस्लामी धर्मांधांनी आक्रमण केलेे. ‘जमात-ए-अहमदिया पाकिस्तान’ या संघटनेने ही माहिती प्रसारित केली आहे. इस्लाममध्ये महंमद पैगंबर हे एकमेव प्रेषित असल्याचे मानले जाते. अहमदिया समूदाय मात्र मिर्झा गुल अहमद यांना प्रेषित मानते. त्यामुळे मुसलमान समाज अहमदियांना ‘मुसलमान’ मानत नाहीत. यामुळे पाकमध्ये या समाजावार वारंवार आक्रमणे केली जातात. ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ (टी.एल्.पी.) ही कट्टरतावादी आतंकवादी संघटना अहमदियांच्या विरोधात कारवाया करण्यात अग्रेसर आहे. तथापि अहमदियांच्या विरोधात कारवाया केल्याच्या प्रकरणात या संघटनेच्या एकाही कार्यकर्त्यावर आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध जेथे अल्पसंख्य असतात, तेथे ते बहुसंख्यांकांवर आक्रमण करतात, तसेच ते ज्या ठिकाणी बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांवर आक्रमण करतात, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे !