हिंदु आदिवासींना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रलोभन दाखवल्याचे प्रकरण !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यात २४ जानेवारी २०२३ या दिवशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आमीष दाखवल्याच्या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जोस पापाचेन आणि शिजा यांना अटक केली होती. मार्चमध्ये या दोघांनाही विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर आरोपींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर नुकतीच सुनावणी होऊन न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी त्यांना जामीन संमत केला.
आरोपींच्या अधिवक्त्यांनी युक्तीवाद केला की, ‘हे दोघे लोकांमध्ये बायबलचे वाटप करत होते. गावातील लोकांना एकत्र करून सभा आणि ‘भंडारा’ आयोजित करत होते. या सर्व कृतींना ‘धर्मांतरासाठी प्रलोभन दाखवले’, असे म्हणता येणार नाही.’ या प्रकरणात सरकारी अधिवक्त्यांनी जामिनाला विरोध करत आरोपींना उत्तरप्रदेशात ख्रिस्ती राज्य स्थापन करायचे असल्याचा युक्तीवाद केला. ‘ते हिंदु धर्मातील लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करत होते आणि गावकर्यांवर मानसिक दबाव आणत होते’, असेही सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले.
शिक्षणाच्या नावाखाली लोकांना ख्रिस्ती बनवण्याचे षड्यंत्र !
शिक्षणाच्या नावाखाली लोकांना ख्रिस्ती बनवण्याचा डाव नवीन नाही. यापूर्वी झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराची घटना घडली होती. मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या बहाण्याने तेथे धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात होते.
संपादकीय भूमिकामुसलमान किंवा ख्रिस्ती यांचे नव्हे, तर केवळ हिंदूंचेच धर्मांतर का होते ?, याचे चिंतन करून हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे आवश्यक ! |