बलुच लिबरेशन आर्मीच्या कमांडरची थेट चीनला चेतावणी
इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीन त्याच्या पाकमधील आर्थिक महामार्गाच्या आणि नौदल तळाच्या माध्यमांतून बलुचिस्तानवर नियंत्रण मिळवण्याच्या सिद्धतेत आहे. यावरून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या बलुच लिबरेशन आर्मीच्या एका कमांडरने चीनला चेतावणी दिली आहे. एक व्हिडिओ प्रसारित करून ‘चीनने बलुचिस्तानपासून दूर रहावे’, असे त्याने म्हटले आहे. गेल्या काही मासांमध्ये बलुची लोकांनी चिनी अभियंत्यांवर आक्रमणे केलेली आहेत. यात चिनी लोक मारले गेले आहेत.
BLA लीडर जैब बलोच ने वीडियो जारी कर दी धमकी
चीन को बलूचिस्तान से दूर रहने की चेतावनी दी
‘पाकिस्तान ने बलूचिस्तान पर कब्जा किया’- जैब बलोचWatch: https://t.co/TiLJCy86iL#China #Balochistan #Bharat24Digital@A_suryavanshi_ @CMShehbaz pic.twitter.com/7qRNQttlxy
— Bharat 24 – Vision Of New India (@Bharat24Liv) September 4, 2023
बलूच कमांडर बशीर जैब बलोच याने म्हटले आहे की, बलुचिस्ता एक स्वतंत्र देश होता. त्यावर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण मिळवले आहे. पाकचे सैन्य बलुचिस्तानमधील खनिजे विकून पैसे कमवत आहेत. मी जगातील सर्व देशांना आणि विशेषतः चीनला सांगू इच्छितो की, बलोच एक देश आहे आणि त्याला इतिहास आहे. आम्ही जगाच्या इतिहासामध्ये एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहोत. विदेशी शक्ती पाकिस्तान सरकारशी हातमिळवणी करून बलुचिस्तानची लूट करत आहेत. हे थांबले पाहिजे.