१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व आणि त्यांच्यासंदर्भात अनुभवलेले भावक्षण यांविषयी बोलतांना भावविश्वात रंगून जाणे
‘२०.५.२०२३ या दिवसापासून मला पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत) यांच्या शेजारी सेवेला बसण्याची संधी मिळाली. एक दिवस आम्ही दोघी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व कसे आहे ? ते सर्व साधकांना कसे साहाय्य करतात आणि आम्ही दोघींनी त्यांच्याविषयी अनुभवलेले भावक्षण’ यांविषयी बोलत होतो. आम्ही दोघी या भावविश्वात रंगून गेलो होतो. त्या वेळी आम्हा दोघींनाही पुष्कळ आनंद होत होता. त्यानंतर लगेच आम्ही दोघींनीही आपापली सेवा करण्यास प्रारंभ केला.
२. श्रीमती मनीषा गाडगीळ यांना सुगंधाची अनुभूती येणे
काही वेळांतच मला वेगळ्याच प्रकारचा सूक्ष्म गंध आला. ‘तो गंध खोलीभर पसरला आहे’, असे मला जाणवले. तेव्हा पू. आजी म्हणाल्या, ‘‘आपण ईश्वराविषयी बोलत असल्याने आपल्याला त्याच्या अस्तित्वाची अनुभूती आली.’’
३. ‘कुणीतरी हाक मारत आहे’, असे वाटणे आणि दोघींनी (पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी) मागे वळून पाहिल्यावर अन् दार उघडल्यावरही तिथे कुणीच नसणे
त्यानंतर आम्ही पुन्हा सेवा चालू केली. वातावरण एकदम शांत होते. तिथे आमच्या दोघींव्यतिरिक्त अन्य कुणीही नव्हते. पाच मिनिटांतच ‘आम्हाला कुणीतरी हाक मारत आहे’, असे आम्हा दोघींनाही वाटले. आम्ही बसलो होतो, त्या ठिकाणाहून मागच्या बाजूने आवाज आला. पू. आजींना ‘आजी’ अशी हाक ऐकू आली आणि मला ‘ताई’ अशी हाक ऐकू आली. आम्ही दोघींनी एकाच वेळी मागे पाहिले. पू. आजी मला म्हणाल्या, ‘‘कुणीतरी मला हाक मारत आहे का ? मला अगदी स्पष्ट आवाज ऐकू आला.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘हो ना ! मलाही हाक ऐकू आली; म्हणून मीही मागे वळून पाहिले.’’ तेव्हा पू. आजी म्हणाल्या, ‘‘दार उघडून पाहूया, कोणी आले आहे का ?’’ मी दार उघडून पाहिले. तेव्हा तिथे कुणीच नव्हते. ‘एकाच वेळी दोघींना हाक कशी ऐकू आली ?’, याचे आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटले.
४. ‘गुरूंनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) आम्हाला हाक मारली’, असे दोघींना वाटणे आणि गुरुदेवांच्या सूक्ष्मातील अस्तित्वाने खोलीतील वातावरणातही थंडावा जाणवणे
‘गुरूंनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) आम्हाला हाक मारली’, असे आम्हा दोघींना वाटले. पुन्हा एकदा गुरूंनी आम्हाला त्यांचे अस्तित्व जाणवून दिले. ‘मी तुमच्या समवेतच आहे ’, हे दर्शवून दिले. त्यांच्या अस्तित्वाने त्या वेळी खोलीतील वातावरणातही आम्हाला थंडावा जाणवला. आम्हा दोघींनाही आनंद झाला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलत असल्याने पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात एकत्रित वाढ होऊन दोघींना एकाच वेळी नादाची अनुभूती आल्याचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे
‘दोघींना एकदम हाक कशी ऐकू आली ? एकच अनुभूती आणि एकाच वेळी दोघींना कशी आली ?’, याचा आम्हाला अर्थ समजला नाही. त्यामुळे पू. आजी मला म्हणाल्या, ‘‘मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीला (पू. आजींची मुलगी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) विचारते.’’
त्याच रात्री पू. परांजपेआजींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना या अनुभूतीविषयी विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘प्रारंभी तुम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलत होतात ना ? त्या सत्संगामुळे तुमच्या दोघींमधील सत्त्वगुणात वाढ झाली. एकत्रित सत्त्वगुणात वाढ झाल्यामुळे दोघींना नाद स्वरूपात हाक मारल्याचा आवाज ऐकू आला. ही नादाची अनुभूती तुम्हा दोघींना आली. श्रीमती मनीषा गाडगीळ यांना सूक्ष्म गंधाची आलेली अनुभूती पृथ्वीतत्त्वाची आहे. छान आहे.’’
हे गुरुदेवा, ‘तुम्हाला हाक न मारताही तुमची आठवण काढताच तुम्हीच आम्हा दोघींना हाक मारलीत. तुम्ही प्रत्येक साधकाच्या हृदयात आहात’, याचीच तुम्ही आम्हाला अनुभूती दिलीत’, यासाठी आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६१ वर्षे) (१.७.२०२३)
|